loader
Breaking News
Breaking News
Foto

वरवेली मराठवाडी येथील अंगणवाडी सेविका सीमा किर्वे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार

वरवेली (वार्ताहर) - गुहागर तालुक्यातील वरवेली मराठवाडी येथील अंगणवाडी सेविका सीमा गणेश किर्वे यांना सामाजिक क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून ग्रामपंचायत स्तरीय "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार "सन २०२५/२०२६ वर्षीचा शासनाचे प्रतिनिधी म्हणून वरवेली ग्रामपंचायत सरपंच नारायण आगरे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले. अंगणवाडी सेविका सीमा गणेश किर्वे यांना जिल्हा परिषद रत्नागिरीच्या वतीने "आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार" मिळाला होता. त्याचे वितरण गुहागर पंचायत समितीच्या आमसभेत आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अंगणवाडी मराठवाडी मध्ये ७ लाखापेक्षा जास्त निधी लोकसहभागातून त्यांनी जमा केला आहे. प्रत्येक वर्षी अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना लोकसहभागातून मोफत गणवेश देण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांसाठी अनेक शिक्षणासाठी लागणारे साहित्य लोक सहभागातून प्राप्त होत आहेत. अंगणवाडी मराठवाडी येथील विद्यार्थ्यांना लोकसहभागातून दररोज दूध व अंडी देण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे या अंगणवाडीमध्ये खाजगी शाळांमध्ये जे उपक्रम राबवले जातात ते उपक्रम राबवले जात आहेत. जेणेकरून या परिसरातील विद्यार्थी शिक्षणासाठी शहराकडे जाणार नाहीत याची दक्षता घेतली जात आहे. या कामी अंगणवाडी मदतनीस अस्मिता पवार तसेच पालक समितीच्या अध्यक्षा मनस्वी किर्वे व सर्व पालक तसेच ग्रामपंचायत मधील सरपंच उपसरपंच सर्व सदस्य व ग्रामस्थ यांचे विशेष सहकार्य त्यांना मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

टाईम्स स्पेशल

महिला बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी महिलांसाठी विविध उपक्रम राबवले आहेत, श्री महालक्ष्मी महिला बचत गट वरवेली तेलीवाडीच्या अनेक वर्ष सचिव म्हणून त्यांनी उत्कृष्ट काम केले आहे.ग्रामीण भागातील बांधकाम कामगारांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून त्यांनी बांधकाम कामगारांना विविध योजनांचा त्या लाभ देत आहेत तसेच विविध प्रकारच्या बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यासाठी त्या प्रयत्नशील असतात. डेरवण येथील वालावलकर रुग्णालयामध्ये अनेक रुग्णांवरती विविध योजनांच्या माध्यमातून त्यांनी उपचार करून घेतले आहेत. रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून त्या सामाजिक कार्य करत आहेत. एखाद्या रुग्णांना तातडीची रुग्णसेवा मिळण्यासाठी त्यांचा नेहमी पुढाकार असतो. अंगणवाडी सेविका सीमा गणेश किर्वे यांना महाराष्ट्र शासनाकडून मिळालेल्या "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार "मिळाल्याबद्दल विविध स्तरातील मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले आहे व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg