loader
Breaking News
Breaking News
Foto

श्रावण सोमवारनिमित्त संगमेश्वरात वारकरी दिंडीचे आयोजन

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - श्रावण महिन्यातील सोमवारचे औचित्य साधून शास्त्री तिरी संत वारकरी संप्रदाय, संगमेश्वर यांच्या वतीने सोमवार, दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. या दिंडीत परिसरातील वारकरी व भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. ही दिंडी संगमेश्वर येथील राम मंदिरातून सकाळी १० वाजता सुरू होणार असून, गणपती मंदिर, निनावी मंदिर, जाखमाता मंदिर, शास्त्रीपूल, संभाजी महाराज चौक मार्गे कर्णेश्वर मंदिरापर्यंत जाणार आहे. श्रावण सोमवारनिमित्त आयोजित या दिंडीमध्ये वारकरी संप्रदायातील भक्त मंडळी सहभागी होणार असून, भजन, नामस्मरण आणि भक्तिमय वातावरणात दिंडी काढण्यात येणार आहे. दिंडीचा कालावधी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत राहणार आहे. श्रावण सोमवारच्या निमित्ताने निघणार्‍या या भक्तिमय दिंडीमुळे संगमेश्वर परिसरात वारकरी परंपरेचा जागर होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg