दापोली (वार्ताहर) : अन्न व औषध प्रशासन विभाग (महाराष्ट्र), नेस्ले इंडिया आणि नॅसवी (NASVI) यांच्या संयुक्त विद्यमाने दापोलीतील खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी Food Safety Training (FoSTaC)अन्न सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण २२ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १ वाजता सेवाव्रती शिंदे गुरुजी सभागृह, दापोली येथे होणार आहे. या राज्यस्तरीय अन्न सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्राचे गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज तसेच अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद रत्नागिरीच्या अध्यक्षा अस्मिता केंद्रे, पंचायत समिती दापोलीचे सभापती उमेश राजे, नगरपंचायत दापोलीच्या नगराध्यक्षा कृपा घाग, नेस्ले कंपनीचे हेड कॉर्पोरेट अफेअर्स (पश्चिम) संजय भंडारी तसेच NASVIचे वरिष्ठ व्यवस्थापक गुरुनाथ सावंत हे उपस्थित राहणार आहे. अन्नपदार्थ विक्रेत्यांना अन्न सुरक्षा मानके व नियमांबाबत मार्गदर्शन मिळावे, व्यवसायासाठी आवश्यक सुरक्षित अन्न पुरवठा सुनिश्चित व्हावा आणि ग्राहकांना सुरक्षित व स्वच्छ अन्न मिळावे, हा प्रशिक्षणाचा प्रमुख उद्देश आहे.
प्रशिक्षण मोफत असून सहभागी विक्रेत्यांना अन्न सुरक्षा मानकांनुसार FoSTaC प्रशिक्षण व शासकीय प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच प्रशिक्षणार्थींना हायजीन किट मोफत देण्यात येणार असून त्यामध्ये एप्रन, कॅप, ग्लोव्हज, नॅपकिन व अन्य आवश्यक साहित्याचा समावेश असेल. अन्नपदार्थ विक्रेत्यांसाठी हे प्रशिक्षण महत्त्वाचे असून व्यवसायाच्या अधिकृत परवानगीसाठी आणि सुरक्षित अन्न पुरवठ्यासाठी आवश्यक प्रमाणपत्र मिळविण्याची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे दापोलीतील सर्व खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी प्रशिक्षणस्थळी उपस्थित राहून आपली नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. सुरक्षित अन्न • स्वच्छ व्यवसाय • सुरक्षित ग्राहक हा संदेश या उपक्रमातून देण्यात येत आहे.
























1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.