loader
Breaking News
Breaking News
Foto

‘महाराष्ट्र राज्य निरपेक्ष किर्तन सेवा संस्था परमार्थिक संघटना’ गुहागर तालुका अध्यक्षपदी वेळंबचे ‘ह.भ.प. बबन महाराज कुंभार’ यांची निवड

वरवेली(गणेश किर्वे)- महाराष्ट्र राज्य निरपेक्ष किर्तन सेवा संस्था परमार्थिक संघटना संस्थापक अध्यक्ष ह. भ. प. नाना महाराज कापडणीस, सोयगाव, मालेगाव, नाशिक यांच्या माध्यमातून गुहागर तालुका अध्यक्षपदी वेळंब गावातील ज्येष्ठ प्रवचन व कीर्तनसेवक हरिभक्त बबन महाराज कुंभार यांची निवड करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ते १९९१ पासून वारकरी सांप्रदायातील सर्वांच्या सहकार्याने प्रवचन व किर्तन सेवा करत आहेत. द्वादशी कीर्तन सेवा मंडळ गुहागरच्या माध्यमातून तालुक्यातील अनेक ठिकाणी प्रत्येक द्वादशीस निरपेक्ष स्वतः नियोजन करून गेली पंधरा वर्षे सातत्याने सेवा करीत आहेत. अनेक वारकरी यासाठी सर्वतोपरी सहकार्य त्यांना करत आहेत. ते हनुमान भक्त असून गेली पस्तीस वर्षे श्रीराम नवमी ते श्री हनुमान जन्मोत्सव असा सात दिवसांचा अखंड हरीनाम सप्ताह अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवत करीत असतात. आज पावेतो महिला सहित एकूण अठरा नवीन कीर्तन सेवक यांना व्यासपीठ उपलब्ध करून आवश्यक मार्गदर्शन केले आहे.

टाइम्स स्पेशल

विश्व हिंदू परिषदेने याची माहिती घेऊन गुहागर तालुक्यातून प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहळा अयोध्या येथे एकमेव यांनाच उपस्थित राहण्याची संधी प्राप्त करून दिली होती. विश्व हिंदू परिषद गुहागर प्रखंड मंत्री म्हणून त्यांच्यावर जबाबदारी आहे. सर्व फड परंपरेशी यांचा जवळून सहभाग असतो. अनेक वैयक्तिक घरगुती आणि सप्ताहातील किर्तनसेवा त्यांना दिल्या जातात. सेवा याच माध्यमातून ते परमार्थाकडे पाहत असल्याने कोणतीही अपेक्षा न ठेवता असेल त्या व्यवस्थेत सेवा करावी, प्रचार, प्रसार करावा, विज्ञान दृष्टीने पटवून द्यावे, वाईट व्यसनापासून दूर राहून सर्वांनी आरोग्य युक्त जीवन जगावे असा त्यांच्या मानस असून पैसा, मान, जाहिरात, मोठेपणा, नाव कमावणे यापासून ते नेहमीच दूर राहतात.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg