loader
Breaking News
Breaking News
Foto

संशोधनाची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्राध्यापकांना मार्गदर्शन; रत्नागिरी जिल्ह्यातील २३ महाविद्यालयांतील ६० प्राध्यापकांचा सहभाग

दापोली (वार्ताहर) : मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या ‘आविष्कार २०२६-२७’ या आंतर-महाविद्यालयीन संशोधन परिषदेच्या पूर्वतयारीसाठी दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजमध्ये प्राध्यापकांसाठी जिल्हास्तरीय ‘आविष्कार’ कार्यशाळेचे उत्साहात आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची वृत्ती विकसित करणे, त्यांना संशोधनासाठी प्रेरित करणे तसेच त्यांनी निवडलेल्या संशोधन विषयाचा आवाका, उपयुक्तता आणि दैनंदिन जीवनातील महत्त्व याबाबत योग्य मार्गदर्शन करता यावे, या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनील पाटील, ‘आविष्कार’ ओ.एस.डी. डॉ. मीनाक्षी गुरव, रत्नागिरी जिल्हा समन्वयक प्रो. डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई आणि रत्नागिरी जिल्हा सह-संयोजक तथा दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. घनश्याम साठे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा पार पडली. कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी दापोली एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन डॉ. प्रसाद करमकर यांनी अध्यक्षस्थान भूषविले. अध्यक्षीय भाषणात डॉ. करमकर यांनी प्राध्यापकांनी अधिकाधिक दर्जेदार आणि समाजोपयोगी संशोधन प्रकल्प ‘आविष्कार’ स्पर्धेत सादर करण्याचे आवाहन केले. संशोधन केवळ कागदावर किंवा प्रयोगशाळेपुरते मर्यादित न राहता त्याचा थेट फायदा समाजाला झाला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. प्राचार्य प्रा. डॉ. घनश्याम साठे यांनी प्रास्ताविक करताना ‘आविष्कार’ स्पर्धेचे स्वरूप, नियम व अटी तसेच उत्कृष्ट संशोधन प्रकल्प सादरीकरणाबाबत सविस्तर माहिती दिली.

टाईम्स स्पेशल

या कार्यशाळेला रत्नागिरी जिल्ह्यातील २३ महाविद्यालयांमधून ६० प्राध्यापक सहभागी झाले होते. तज्ज्ञ मार्गदर्शक डॉ. शशिकांत मेनन, डॉ. सुनिता शैलजन आणि डॉ. मीनाक्षी गुरव यांनी प्राध्यापकांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना संशोधनासाठी कसे प्रेरित करावे, तसेच संशोधन प्रकल्पांची गुणवत्ता कशी वाढवावी, यावर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यशाळेचे नियोजन ‘आविष्कार’ व प्लेसमेंट कमिटीचे समन्वयक डॉ. विक्रम मासाळ, समिती सदस्य डॉ. निवास देसाई, डॉ. पूनम पानस्कर, प्रा. दिपाली नागवेकर, प्रा. सिद्धी साळगावकर, महेश ठीक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg