loader
Breaking News
Breaking News
Foto

राजापुरात एसटी बसची स्विफ्ट डिझायरला धडक; तिघे जखमी

राजापूर, (वार्ताहर): एसटी चालकाने स्विफ्ट डिझायर कारला अक्षरशः फरफटत नेत झालेल्या अपघातात कारमधील ३ जण जखमी झाले. तालुक्यातील केळवलीफाटा येथे जामदे पूलाजवळ एसटी बस आणि स्विफ्ट कार यांच्यात झालेल्या अपघातात कारचालकाने दाखविलेल्या प्रसंगावधनामुळे कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. यामध्ये एसटी व कार या दोन्ही वाहनांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले. शनिवारी सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. याप्रकरणी कारचालक अमित रमेश साटम रा.शिरगाव देवगड यांनी दिलेल्या तक्रारीवरून एसटी चालकाविरोधात राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात कारमधील युधीराज भिकाजी राणे (३२), विघ्नेश रामदास म्हाळवदे (२५) व राज रामदास म्हाळवदे (२२) हे तिघे जखमी झाले. हे तिघेही शिरगाव देवगड जि.सिंधुदुर्ग येथील रहिवासी आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पोलीसांनी दिलेल्या माहितीनूसार अमित साटम हे आपली कार क्र.एमएच ०७ बीजी ९०९७ घेऊन सिंधुदुर्ग शिरगाव येथून आपल्या मित्रांसह प्रवास करत होते. ते कारने केळवली पाचलमार्गे अणुस्कूरा दिशेने पूणेकडे जात असताना वैभववाडीच्या दिशेने येणारी कणकवली आगाराची भुईबावडा रिंगेवाडी खारेपाटण एमएच २०बीएल ३०७९ क्रमांकाची एसटी बसचालक गणपती भाऊसाहेब जाधव यांच्या ताब्यात होती. या बसवर वाहक म्हणून दशरथ गोविंद जाधव हे काम पहात होते. ही एसटी बस ही केळवली फाट्याजवळील जामदेपूलाच्या जवळ आली असताना वळणाच्या रस्त्याच्या परिस्थितीकडे योग्य लक्ष न देता एसटी चालकाने बस भरधाव वेगात चालविल्याने बसने समोरून येणार्‍या या कारला जोरदार धडक दिली. यामुळे कार रस्त्यावर एसटी बसबरोबरच फरफटत गेली व या अपघातात कारमधील तीन जण जखमी झाले.

टाईम्स स्पेशल

अपघाताची माहिती मिळताच राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव, पोलीस हेडकाँस्टेबल रहिम मुजावर घटनास्थळी पोहोचले. जखमींवर तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. राजापूर एसटी प्रशासनाला याबाबत माहिती मिळताच राजापूर आगारप्रमुख काव्या पेडणेकर, वाहतुक नियंत्रक अजय सिडाम यांनी देखील अपघातस्थळी धाव घेतली. सिंधुदुर्गचे विभागीय वाहतूक अधिक्षक निलेश लाड यांनी देखील तत्काळ अपघातस्थळी भेट दिली. या अपघातात एसटी बसचे सुमारे चाळीस हजार तर कारचे सुमारे साठ हजाराचे नुकसान झाल्याची प्राथमिक नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी राजापूर पोलीसांनी एसटी चालक गणपती जाधव याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५ (अ) व मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg