loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर साटले स्टडी हाऊस अबॅकस क्लासेसचे विद्यार्थ्यांचे आंतरराष्ट्रीय अबॅकस कॉम्पिटिशन मध्ये दैदिप्यमान यश

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर साटले स्टडी हाऊस अबॅकस क्लासेसचे विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय अबॅकस कॉम्पिटिशन मध्ये दैदिप्यमान यश प्राप्त केले असून आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्यार्थी चमकले आहेत. गुहागर येथील साटले स्टडी हाऊस अबॅकस क्लासेसच्या ओनर सोनाक्षी प्रशांत साटले यांनाही पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. गुहागर येथील लिटिल फ्लॉवर प्री स्कूल यांच्या माध्यमातून मुलांना सन्मानित करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आंतरराष्ट्रीय अबॅकस कॉम्पिटिशन २०२६ मध्ये एकूण १४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यामधून तब्बल चार विद्यार्थी आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकले आहेत. पहिला क्रमांक अस्मि पराग सावंत, दुसरा क्रमांक अन्वित दिनेश राऊत, तिसरा क्रमांक हृदयेश प्रशांत साटले आणि साई राजेंद्र गोडसे. त्याचप्रमाणे मेंटल अरेथ मॅटिक अबॅकस ऑल इंडिया टॅलेंट सर्च प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून या पूर्वी ही २०२४/२५ मध्ये देखील बेस्ट अबॅकस क्लास म्हूणन गौरविण्यात आलेले आहे.

टाईम्स स्पेशल

आता २०२६ मध्ये देखील परत एकदा साटले स्टडी हाऊस अबॅकस क्लासेस गुहागर यांना बेस्ट अबॅकस क्लास म्हणून सन्मान मिळालेला आले. एकंदरीत साटले स्टडी हाऊस अबॅकस क्लासेस चा वाढता आलेख बघता पालकांनी समाधान व्यक्त केले आहे. सर्वच क्षेत्रातून साटले क्लासेससाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg