loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड तालुक्यातील कुपोषित बालकांसाठी तपासणी व पौष्टिक लाडू वाटप कॅम्प संपन्न

खेड (प्रतिनिधी)- उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे दि. १९/०८/२०२६ रोजी खेड तालुक्यातील कुपोषित बालकांसाठी बालरोग तज्ञांकडून तपासणी व पौष्टिक लाडू वाटप कॅम्प संपन्न झाला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांचे मार्गदर्शनानुसार कुपोषित बालकांना पौष्टिक लाडू वाटप कॅम्प तसेच कुपोषित बालकांसाठी पूरक पोषण आहार या संदर्भात डॉ. जगताप यांनी मार्गदर्शन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शिबिरात आलेल्या बालकांना जंतनाशक औषधे, प्रोटीन पावडर, रक्तवाढीची औषधे, टॉनिकची औषधे देण्यात आली. डॉ. विलास शेळके यांनी कुपोषण मुक्तीच्या अनुषंगाने स्वच्छता, पूरक पोषण आहार, लसीकरण तसेच बालकाची वजन उंची दंडघेर मोजणे इ. महत्वाच्या विषयावर मार्गदर्शन केले.

टाईम्स स्पेशल

डॉ. बालाजी सगरे, वैद्यकीय अधिक्षक डॉ भालेराव, RBSK कार्यक्रम जिल्हा पर्यवेक्षक संआरती कदम, CDPO जगताप यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. यावेळी सर्व RBSK वैद्यकीय अधिकारी व सर्व स्टाप METRAN हळदणकर, डेरवण हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी व स्टाप उपस्थित होते. २८ मुलांनी सदर शिबिराचा लाभ घेतला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg