पनवेल :- भारतीय जनता पक्ष उत्तर रायगडच्या वतीने विभाजन विभीषिका दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार तथा माध्यम सल्लागार डॉक्टर उदय निरगुडकर यांनी उपस्थितांशी आणि प्रामुख्याने तरुणांशी सखोल संवाद साधला. हा कार्यक्रम शुक्रवारी पनवेल येथील विरूपाक्ष मंगल कार्यालयात पार पडला.
'नेमकं काय घडलं ! - १९४७'ची फाळणी आणि सध्याची वैचारिक फाळणी या मुख्य विषयावर आधारित या कार्यक्रमात देशाच्या इतिहासातील १९४७ च्याफाळणीच्या वेदनादायक आठवणींना उजाळा देण्यात आला. तसेच आजच्याकाळातील वैचारिक फाळणीवर डॉक्टर उदय निरगुडकर यांनी आपल्या अभ्यासपूर्ण व ओघवत्या शैलीत सविस्तर भाष्य केले. युवकांनी देशाचा इतिहास बारकाईने समजून घेतला पाहिजे आणि योग्य दृष्टिकोन अंगी बाळगून वैचारिक प्रगल्भता वाढवली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात उपस्थितांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे दिली. या वैचारिक मंथनाचा लाभघेण्यासाठी तरुण वर्ग आणि भाजप कार्यकर्त्यांनी सभागृहात मोठी गर्दी केली होती.
या सोहळ्यास भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महापौर नितीन पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील, सभागृहनेते प्रकाश बिनेदार, महिला व बालकल्याण सभापती ममता म्हात्रे, माजी सभागृहनेते तथा नगरसेवक परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, आदर्श शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धनराज विसपुते, प्रभाग समिती सभापती रवींद्र भगत, नगरसेवक मनोज भुजबळ, सुमित झुंझारराव, प्रवीण पाटील, नगरसेविका मोनिका महानवर, प्रीती जॉर्ज, रुचिता लोंढे, कुसुम पाटील, वर्षा ठाकूर, भाजपचे माजी शहराध्यक्ष जयंत पगडे, शहर उपाध्यक्ष केदार भगत, अमित ओझे, महिला मोर्चाच्या संध्या शारबिद्रे, माजी नगरसेविका प्रभाकर बहिरा, अभिषेक पटवर्धन आणि चिन्मय समेळ उपस्थित होते.
























1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.