loader
Breaking News
Breaking News
Foto

वायरी मुख्य मार्गांवरील धोकादायक खड्‌ड्याची दुरुस्ती; उपसभापती श्याम झाड यांचे तत्पर कार्य

मालवण(प्रतिनिधी) - वायरी मुख्य मार्गांवरील धोकादायक खड्‌ड्याची दुरुस्ती उपसभापती श्याम झाड यांनी तत्परतेने करून घेतली आहे. वायरी माणगावकर काजू फॅक्टरी येथील मुख्य मार्गावर पडलेला मोठा खड्डा पावसाच्या पाण्यामुळे धोकादायक बनला होता. पाणी साचल्याने वाहनचालकांना, पादचारी यांना खड्‌ड्याचा अंदाज येत नसल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली होती. मालवण पंचायत समितीचे उपसभापती घनश्याम (श्याम) झाड यांनी याची तातडीने दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाला माहिती दिली. त्यांच्या पाठपुराव्यानंतर संबंधित विभागाने त्वरित खड्डा बुजवून घेतला. यावेळी देवानंद लोकेगावकर, मुन्ना झाड, भरत माणगावकर, प्रथमेश डिचवलकर आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg