रत्नागिरी (जमीर खलफे) : महाराष्ट्र राज्यातील सर्व केंद्रप्रमुखांना एकाच छताखाली आणण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघाचे राज्याध्यक्ष अशोकराव महाले यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे काम जोमाने सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व केंद्रप्रमुख एकसंघ राहावेत आणि संघटनेची ताकद अधिक वाढावी, या उद्देशाने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्ह्यातील पाच तालुक्यांच्या अध्यक्षांची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघ रत्नागिरीचे राज्य नेते बाबाजी शिर्के यांनी राजापूर, लांजा, संगमेश्वर, गुहागर व मंडणगड या पाच तालुक्यांच्या अध्यक्षपदाची घोषणा केली.
नवनियुक्त तालुका अध्यक्ष पुढीलप्रमाणे : राजापूर तालुका अध्यक्ष - संदिप परटवलकर लांजा तालुका अध्यक्ष - मिलिंद वाघाटे संगमेश्वर तालुका अध्यक्ष - दत्ताराम गोथाड गुहागर तालुका अध्यक्ष - विश्वासराव खर्डे मंडणगड तालुका अध्यक्ष - राजेंद्र रेवाळे या पाचही नवनियुक्त तालुका अध्यक्षांवर संघटनेची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली असून, लवकरच संबंधित तालुक्यांची कार्यकारिणी निवडण्यासही परवानगी देण्यात आली आहे.
यावेळी बोलताना बाबाजी शिर्के म्हणाले की, महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघ रत्नागिरी जिल्ह्याचे काम अतिशय उत्तम प्रकारे सुरू असून, जिल्ह्यातील सर्व केंद्रप्रमुखांनी एकजुटीने काम करून संघटनेला अधिक बळकट करावे. दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातील केंद्रप्रमुखांचा जिल्हास्तरीय भव्य मेळावा लवकरच चिपळूण येथे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष सुनिल जाधव यांनी दिली. महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघ रत्नागिरीच्या वतीने सर्व नवनियुक्त तालुका अध्यक्षांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले असून पुढील संघटनात्मक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

























1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.