loader
Breaking News
Breaking News
Foto

हुतात्मा अनंत कान्हेरे यांना अभिवादन; खेडमध्ये लवकरच भव्य स्मारक

खेड (दिलीप देवळेकर) - ब्रिटिश राजवटीविरोधात अवघ्या १८ व्या वर्षी देशासाठी बलिदान देणारे रत्नागिरी जिल्ह्यातील खेडचे सुपुत्र हुतात्मा अनंत लक्ष्मण कान्हेरे यांना स्वातंत्र्यदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. खेड शहरातील तीन बत्ती नाका परिसरातील हुतात्मा अनंत कान्हेरे चौकात असलेल्या त्यांच्या पुतळ्याला दापोली-खेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नाशिकचे तत्कालीन जिल्हाधिकारी ए. एम. टी. जॅक्सन हे भारतीयांवर अन्याय करणारे ब्रिटिश अधिकारी असल्याचा क्रांतिकारकांचा आरोप होता. २१ डिसेंबर १९०९ रोजी नाशिकच्या विजयानंद थिएटरमध्ये अनंत कान्हेरे यांनी जॅक्सनवर गोळ्या झाडून त्याचा वध केला. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आणि १९ एप्रिल १९१० रोजी ठाणे कारागृहात त्यांना फाशी देण्यात आली. अत्यंत कमी वयात देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या अनंत कान्हेरे यांचे नाव महाराष्ट्राच्या क्रांतिकारी इतिहासात अजरामर झाले आहे. त्यांच्या शौर्याची आणि देशभक्तीची प्रेरणा तरुण पिढीला मिळावी, यासाठी खेड शहरातील मध्यवर्ती ठिकाणी हुतात्मा अनंत कान्हेरे यांचे लवकरच भव्य स्मारक उभारले जाईल, अशी घोषणा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी यावेळी केली.

टाईम्स स्पेशल

खेडच्या भूमीने देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात दिलेल्या या महान क्रांतिकारकाच्या स्मृतींना कायमस्वरूपी उजाळा देणारे हे स्मारक उभारण्याच्या घोषणेमुळे स्थानिक नागरिकांमध्येही समाधान व्यक्त होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg