loader
Breaking News
Breaking News
Foto

३० ऑगस्ट रोजी लांजा तालुका मर्यादित भव्य आंतरशालेय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - श्री साई अनिरुद्ध एज्युकेशन सोसायटी, पाली संचलित, डी. जे. सामंत इंग्लिश मीडियम स्कूल, लांजा आयोजित रत्नागिरी जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन पुरस्कृत, लांजा तालुका मर्यादित भव्य आंतरशालेय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन रविवार, दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ६.४५ वाजता डी. जे. सामंत इंग्लिश मीडियम स्कूल, लांजा येथे करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या स्पर्धेत सहभाग घेणा-या मुलांचा वयोगट मुले १२ वर्षे (जन्म दि.०१/०१/१५ पुढील ,१४ वर्षे (जन्म दि.०१/०१/१३ पुढील, १६ वर्षे (जन्म दि.०१/०१/११ पुढील, मुली १२ वर्षे(जन्म दि.०१/०१/१५ पुढील, १४ वर्षे (जन्म दि.०१/०१/१३ पुढील, १६ वर्षे (जन्म दि.०१/०१/११ पुढील असला पाहीजे तर अंतर मुलांसाठी 12 वर्ष 1की.मी., 14वर्ष 2कीमी, १६ वर्षे ३ किमी मुलीकरीता अंतर, १२ वर्षे१ किमी, १४ वर्षे. २ किमी, १६ वर्षे २ किमी स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना प्रथम क्रमांक रोख रक्कम व मेडल, द्वितीय क्रमांक रोख रक्कम व मेडल, तृतीय क्रमांक रोख रक्कम व मेडल व उत्तेजनार्थ रोख रक्कम अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

टाईम्स स्पेशल

सर्व स्पर्धकांसाठी टी-शर्ट व सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. अधिक माहीतीसाठी 8007922127, 95884 76071, 9921454053 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ऑनलाईनही नोंदणी करता येणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg