मंडणगड (प्रतिनिधी) : बोरघर गावठण रस्त्यात पडलेल्या मोठ मोठाल्या खड्ड्यांमुळे रस्ता वाहतूक योग्य राहीलेला नाही. त्यामुळे या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक धोक्याची झाली आहे. मात्र तरीसुद्धा जिल्हा परिषद बांधकाम विभाग ही महत्वाची समस्या सोडविण्यासाठी लक्षच देत नाही. मंडणगड तालुक्यातील माहू बोरघर केळवत या नावाचा सरकार दरबारी नोंद असलेला रस्ता आहे. बोरघर गावठाण ते मुख्य रस्ता १ किमी ६०० मिटर अंतर लांबीचा आहे. यातील सन २०२४ ते सन २०२५ मध्ये केवळ ४०० मिटर लांबीचा रस्ता ८ लाख रुपये निधी खर्च करुन करण्यात आला आहे. तर उर्वरित १ किमी २०० मिटर अंतर रस्ता सुधारणेच्या प्रतिक्षेतच आहे.
ज्या ४०० मिटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. ते सुद्धा सगळीकडे उखडले आहे. तर उर्वरित १ किमी २०० मिटर अंतर लांबीचा रस्ता हा जो डांबरीकरण करुन सुधारणा करण्याचा शिल्लक राहिलेला रस्ता होता. त्या रस्त्याची खड्डे पडून पूर्णतः दुरवस्था झालेली आहे. रस्त्यावर पडलेले भले मोठे खड्डे आणि त्यात तुंबून राहणाऱ्या पाण्यामुळे या मार्गावरील वाहतूक धोक्याची झाली आहे. त्यामुळे बोरघर गावठणातील रहीवाशांना आपल्या रहिवासी भागातून माहू येथे ग्रामपंचायत कार्यालयात जाण्यासाठी स्वस्त दराच्या धान्य दुकानात धान्य उचल करण्यासाठी जाणे अथवा तालूका ठिकाणी जाण्यासाठी बाहेर पडताना मोठं मुष्किलीचे झाले आहे.
त्यात विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना तसेच बाजारहाट करण्यासाठी मंडणगड येथे जाणे कठीण झाले आहे. बोरघर गावठणात एखाद्या आजारी रुग्णाला दवाखान्यात नेण्यासाठी रिक्षा वाहन जादा पैसे देऊ सांगितले तरी रिक्षा चालक रुग्णांना नेण्यासाठी आपले वाहन या रस्त्यावरून घालण्यात तयार होत नाहीत. एवढी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. एरवी निवडणुकांच्या दरम्यान दारोदार फिरून मतांच्या जोगव्यासाठी उंबरठा झिजवणारे आता मात्र सोयिस्करपणे मुग गिळून आहेत. तर बांधकाम विभाग अधिकारी निधी नसल्याचे कारण पुढे करत वेळ निभावून नेत आहेत.
























1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.