loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई-गोवा महामार्गासाठी गडकरींची भेट; गणेशोत्सवात अतिरिक्त रेल्वे गाड्या

मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. निसर्गामुळे निर्माण होणाऱ्या विविध अडचणींमुळे महामार्गाच्या कामाला विलंब होत आहे. मात्र, हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे खासदार नारायण राणे यांनी सांगितले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात मोठ्या संख्येने चाकरमानी दाखल होतात. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणात अतिरिक्त रेल्वे गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती खासदार नारायण राणे यांनी दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रत्नागिरीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एमआरआय मशीन उपलब्ध व्हावी, यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे राणे यांनी सांगितले. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांना एमआरआय तपासणीसाठी इतर शहरांमध्ये जाण्याची गरज कमी होणार आहे. दरम्यान, जिल्हा परिषद तसेच महसूल विभागातील मोठ्या प्रमाणातील रिक्त पदे भरण्यासाठी संबंधित मंत्र्यांची भेट घेऊन पाठपुरावा करणार असल्याचेही खासदार राणे यांनी स्पष्ट केले.

टाईम्स स्पेशल

महामार्ग, रेल्वे, आरोग्य आणि शासकीय रिक्त पदे या चारही महत्त्वाच्या प्रश्नांवर पाठपुरावा करण्याची ग्वाही खासदार नारायण राणे यांनी दिल्याने रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने या प्रयत्नांना महत्त्व प्राप्त झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg