पनवेल :- निसर्गरम्य डोंगररांगा, हिरवाईने नटलेला परिसर, आल्हाददायक वातावरण आणि उत्साहाने भारलेले ट्रेकर्स अशा आनंददायी वातावरणात धोदानी ते माथेरान ‘इको-फ्रेंडली ट्रेक’ मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात पार पडला. कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सोबत नागरिक, युवक, महिला आणि निसर्गप्रेमींनी या ट्रेकमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत निसर्गाच्या सानिध्यात ट्रेकिंगचा आनंद लुटला. धोदानी बस स्टॉप येथील श्री राम मंदिरापासून सकाळी ट्रेकला सुरुवात झाली. पहाटेच्या प्रसन्न वातावरणात सहभागी ट्रेकर्सनी उत्साहाने मार्गक्रमण करत धोधानी ते माथेरानचा निसर्गरम्य डोंगराळ मार्ग सर केला. वाटेत दिसणाऱ्या हिरव्यागार डोंगररांगा, वनराई, घाटवाटा आणि मनमोहक निसर्गदृश्यांनी ट्रेकर्सचा उत्साह अधिकच वाढवला. ट्रेकदरम्यान फिटनेस, आरोग्यदायी जीवनशैली आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. या ट्रेकिंगमध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे, माजी शहराध्यक्ष जयंत पगडे, प्रभाग समिती सभापती रविंद्र भगत, आदर्श शिक्षण संस्थेचे चेअरमन धनराज विसपुते, शहर अध्यक्ष व नगरसेवक सुमित झुंजारराव, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सागर सांगडे, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजेश भगत, शहर चिटणीस रुपेश नागवेकर, विश्वजीत पाटील, अनेश ढवळे, युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष हिमेश बहिरा, सरपंच सीताराम चौधरी, प्रशांत मोरबाळे, अंकुश पाटील, सतीश मालुसरे, सतीश मालुसरे, निलेश भोईर, मंगेश पिलविळकर यांच्यासह इतर पदाधिकारीसुद्धा सहभागी झाले होते.
या ट्रेकचे विशेष आकर्षण म्हणजे आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वतः सहभागी होत नागरिकांसोबत ट्रेकिंगचा आनंद घेतला. युवक, महिला, नागरिक आणि निसर्गप्रेमींसोबत संवाद साधत त्यांनी सहभागींच्या उत्साहाला प्रोत्साहन दिले. लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी एकत्रितपणे निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवत आरोग्यदायी जीवनशैलीचा अनुभव घेण्याचा हा उपक्रम सहभागींसाठी संस्मरणीय ठरला. आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत नागरिकांनी काही काळ दैनंदिन व्यापापासून दूर जाऊन निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवावा, शारीरिक तंदुरुस्तीला प्राधान्य द्यावे आणि पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता. ट्रेकमध्ये सहभागी झालेल्या युवकांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला. चढ-उतार, डोंगरवाटा आणि निसर्गरम्य परिसरातून मार्गक्रमण करताना सहभागींच्या चेहऱ्यावर उत्साह आणि आनंद दिसून येत होता. ट्रेकिंगच्या माध्यमातून शारीरिक व्यायामासोबतच आत्मविश्वास, संयम, साहस आणि समूहभावना वाढण्यास मदत होते, हा संदेशही या उपक्रमातून देण्यात आला.मित्र-परिवारासह सहभागी झालेल्या नागरिकांनी निसर्गरम्य परिसरातील विविध क्षण आपल्या आठवणींमध्ये साठवले. डोंगरमाथ्यावर पोहोचल्यानंतर सहभागींच्या उत्साहाला उधाण आले. ‘निसर्गाचा आनंद घ्या, निसर्गाचे संवर्धन करा’ या संदेशाने संपूर्ण ट्रेकमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले.
धोदानी ते माथेरान या निसर्गरम्य मार्गावर अशा आगळ्यावेगळ्या आणि आरोग्यदायी उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल सहभागी नागरिकांनी आमदार प्रशांत ठाकूर यांचे मनापासून आभार मानले. धावपळीच्या जीवनातून नागरिकांना निसर्गाच्या सानिध्यात आणत फिटनेस, साहस आणि पर्यावरण संवर्धनाची सांगड घालणारा हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी असल्याची भावना सहभागीांनी व्यक्त केली. विशेषतः युवकांना ट्रेकिंग, फिटनेस आणि निसर्ग संवर्धनाकडे आकर्षित करण्यासाठी अशा उपक्रमांची सातत्याने गरज असल्याचेही सहभागी नागरिकांनी सांगितले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी नागरिकांसोबत स्वतः ट्रेकमध्ये सहभागी होत त्यांचा उत्साह वाढविल्याबद्दलही उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

























1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.