सावंतवाडी, (प्रतिनिधी) - सावंतवाडी शहरातील गवती मार्केट परिसरातील भाट पेट्रोल पंपाच्या शेजारी बेकायदेशीरपणे विक्रीसाठी ठेवलेला ९६, हजार १०२ रुपये किंमतीचा सुगंधी गुटखा सावंतवाडी पोलिसांनी छापा टाकून जप्त केला आहे. या प्रकरणी आम्हीं अब्दुल गणी शाह (रा. बुरान गल्ली, बाहेरचा वाडा, सावंतवाडी) या संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई बुधवार, दिनांक १९ ऑगस्ट रोजी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास करण्यात आली. आरोपी आम्हीं अब्दुलगणी शाह याने मानवी आरोग्यास अत्यंत अपायकारक आणि बंदी असलेला गुटखा आपल्या ताब्यातील पानपट्टी स्टॉल क्रमांक ३ आणि ४ च्या समोरील लाकडी फळीवर व स्टॉलमध्ये विक्रीच्या उद्देशाने साठवून ठेवला होता.
याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक संजय राजाराम कोरगावकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीवर अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६ मधील कलम २६(२), २६(२)(iv), २७(३)(e), २७(३)(d), ३०(२)(a), ५९ तसेच 'भारतीय न्याय संहिता २०२३' (BNS) चे कलम १२३, २७४ आणि २७५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे (गुन्हा नोंद क्र. २००/२०२६). हा गुन्हा ७ वर्षांपेक्षा जास्त शिक्षेस पात्र असल्याने घटनास्थळी फॉरेन्सिक व्हॅनला देखील पाचारण करण्यात आले होते.
घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, सहाय्यक पोलीस निरीक्षक खंदरकर आणि हेड कॉन्स्टेबल जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक खंदरकर करत आहेत.































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.