loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हास्तरीय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेत ओझर विद्यामंदिरची बाजी

मालवण (प्रतिनिधी) - स्वातंत्र्यवीरांच्या त्यागाला मानवंदना देण्यासाठी यशवंतराव भोसले सैनिक स्कूल, सावंतवाडीच्या वतीने 'ऑगस्ट क्रांती प्रेरणा महोत्सव-२०२६' अंतर्गत आयोजित सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय देशभक्तीपर कला महोत्सवातील देशभक्तीपर समूहगीत स्पर्धेत ओझर विद्यामंदिर, कांदळगाव या प्रशालेने ५ वी ते ७ वी गटामध्ये प्रथम क्रमांक पटकावला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांच्या माध्यमातून स्वातंत्र्यसैनिकांचा त्याग, देशप्रेम, राष्ट्रनिष्ठा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. ओझर विद्यामंदिर कांदळगाव प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी सुरेल गायन, प्रभावी समूहसादरीकरण आणि जोशपूर्ण देशभक्तीच्या भावनेतून उपस्थितांची मने जिंकत प्रथम क्रमांक मिळविला. या समूहगीतासाठी संगीत साथ मंगेश कदम व श्रीकांत मालवणकर यांनी दिली.

टाईम्स स्पेशल

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समितीचे अध्यक्ष शेखर अर्जुन राणे, मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एस. परब, शालेय समितीचे अध्यक्ष किशोर नरे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष राजेंद्र हरी कदम, प्रभारी मुख्याध्यापक, प्रशालेचे शिक्षक, पालक व ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg