loader
Breaking News
Breaking News
Foto

दि मॉडेल इंग्लिश स्कूलच्या तीन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड

रत्नागिरी : दि मॉडेल इंग्लिश स्कूल, सैतवडेच्या क्रीडा क्षेत्रात आणखी एक अभिमानास्पद यशाची नोंद झाली आहे. शाळेतील अनय शेट्ये, चैतन्य शेट्ये आणि कवी दतप्रसाद संसारे या तीन गुणवान विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे दि मॉडेल इंग्लिश स्कूल, सैतवडेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण सराव, मेहनत, जिद्द आणि उत्कृष्ट क्रिकेट कौशल्याच्या जोरावर हे यश संपादन केले. त्यांच्या या निवडीमुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील गुणवत्तेला आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला अधोरेखित करणारे आणखी एक यश मिळाले आहे. या यशासाठी विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षिका जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन, तसेच पालक अभिजीत शेट्ये यांचे विशेष सहकार्य लाभले. मुख्याध्यापिका देशमुख यांच्या प्रेरणेमुळे विद्यार्थ्यांना सातत्याने प्रोत्साहन मिळाले.

टाईम्स स्पेशल

विद्यार्थ्यांच्या या राज्यस्तरीय निवडीबद्दल संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, आजी-माजी विद्यार्थी आणि पालकांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अनय आणि चैतन्य यांच्या या यशाने दि मॉडेल इंग्लिश स्कूल, सैतवडेच्या क्रीडा परंपरेत आणखी एक मानाचा अध्याय जोडला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg