loader
Breaking News
Breaking News
Foto

कुंभवडे येथे वाघाच्या हल्लयात म्हैस ठार; शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण

दोडामार्ग, (प्रतिनिधी) - कुंभवडे येथील शेतकरी सिताराम महादेव परब यांच्या म्हशीवर वाघाने हल्ला करून तिला ठार केले. या घटनेमुळे परिसरातील शेतकर्‍यांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभाग तळकट, ता. दोडामार्ग येथील कर्मचार्‍यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. वाघाच्या हल्ल्यात म्हैस ठार झाल्याने सिताराम परब यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कुंभवडे, खडपडे आणि फुकेरी परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाघाच्या हल्ल्याच्या घटना सातत्याने घडत असून, म्हैस ठार होण्याची ही चौथी घटना असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी आणि पशुपालकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. वाघाचा वावर वाढल्याने शेतकर्‍यांना आपल्या जनावरांची तसेच स्वतःच्या सुरक्षिततेची चिंता सतावत आहे. वनविभागाने या परिसरात वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg