loader
Breaking News
Breaking News
Foto

म्हाप्रल रस्त्यातील खड्डे वाहतुकिला अडसर; सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष कधी देणार ?

मंडणगड (प्रतिनिधी) - मंडणगड म्हाप्रल मार्गे आंबेत पुलावरून मुंबईकडे जाणार्‍या मार्गावर मंडणगड तालुक्यातील म्हाप्रल महसुली गावातील रस्त्यावर ठिक ठिकाणी भले मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यावर पडलेले खड्डे हे सुरक्षित आणि सुरळीत वाहतुकीस अडसर ठरत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मंडणगड म्हाप्रल मार्गे आंबेत पुलावरून पुढे मुंबईकडे जाणारा रस्ता हा वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असा मार्ग आहे. या मार्गावर म्हाप्रल येथे ठिक ठिकाणी भले मोठे खड्डे पडलेले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या आणि वाहनांच्या वर्दळीच्या रस्त्यावर पडलेल्या खड्‌ड्यांमुळे या मार्गावरील वाहतूक धोक्याची झाली आहे. अशा या मार्गावरून अवजड वाहनांसह एस.टी. बसेस तसेच खाजगी प्रवासी वाहने अहोरात्र ये- जा करत असतात. मंडणगड दापोली आणि खेड तालुक्यातील काही गावांना पूणे मुंबईकडे जाण्यासाठी सर्वात जवळचा आणि सोयीचा असा हा मार्ग असल्याने या मार्गाचे वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे असा हा मार्ग वाहतूक योग्य असायला हवा मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यातील खड्डे बुजवण्याकडे दुर्लक्ष केल्याने या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक धोक्याची झाली आहे. गणेशोत्सव काळात या मार्गावरील वाहतूक लक्षात घेऊन खड्डे बुजवून टाकण्याच्या सुधारणेची तात्पुरती का होईना मलमपट्टी केली गेली नाही तर मात्र वाहनांना खड्‌ड्यांचा अडथळा निर्माण होवून या मार्गावरील वाहतूकीची समस्या अधिकच तीव्र होईल.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg