loader
Breaking News
Breaking News
Foto

कोत्रेवाडी ग्रामस्थांच्या डम्पिंग ग्राउंडचा विषय जटील बनत चाललाय, ग्रामस्थांचा विरोध प्रखर

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा शहरातील कोत्रेवाडी येथील डंपिंग ग्राउंड चा विषय जटील बनत चालला आहे. दिवसेंदिवस ग्रामस्थांचा विरोध प्रखर होत चालला आहे. शहरात घनकचरा प्रकल्पाची गरज आहे. जनतेच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून डंपिंग ग्राउंड होणे महत्वाचे आहे. कोत्रेवाडीचे ग्रामस्थ, नगरपंचायत प्रशान आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून सदर प्रश्न मार्गी लावणे अत्यंत गरजेचे झाल्याचे दिसून येत आहे. भारतीय संविधानाने नागरिकांना शांततापूर्ण आंदोलन, भाषण आणि विचार मांडण्याचा मुलभूत अधिकार दिला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

उपोषण किंवा सत्याग्रह हा अहिंसक मार्गाने आपले मत सरकारपर्यंत पोहोचवण्याचा आणि लोकशाहीत दबाव निर्माण करण्याचा एकमेव महत्त्वाचा मार्ग मानला जातो. डंपिंग ग्राउंडविरोधात कोत्रेवाडीतील ग्रामस्थांनी ९३ दिवस आणि १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी केलेले लाक्षणिक उपोषण यातून कोत्रेवाडीतील ग्रामस्थांच्या पदरात काय पडले? आंदोलन, उपोषणाने प्रश्न सुटतात का? हा विषय अभ्यासाचा बनला आहे.

टाईम्स स्पेशल

याच पार्श्वभूमीवर १५ ऑगस्ट रोजी एक दीवस लाक्षणिक उपोषण करून कोत्रेवाडीतील ग्रामस्थांनी सदर लढा संपलेला नाही हे पून्हा दाखवून दिले आहे. ग्रामस्थांच्या संघर्षाचा न्याय केव्हा मिळणार? हा प्रश्न अधांतरीच आहे. लांजा शहरात घनकचरा प्रकल्प झाला पाहीजे यासाठी एक पाऊल पाठी या भूमिकेतून समन्वयातून मार्ग काढला गेला नाही तर लांजा शहराच्या विकासाला खीळ बसेल, असे काही सुज्ञ नागरिकांमधून बोलले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg