लांजा (संजय साळवी) - कुणबी विकास सहकारी पतसंस्था मर्या. लांजा संस्थेची सन २०२५ - २६ सालची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा नक्कीच कुळकर्णी - काळे छात्रालय लांजा येथील सभागृहात संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत परवडी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. सभेच्या सुरुवातीला संस्थेच्या प्रगतीसाठी योगदान देणाऱ्या वीस ज्येष्ठ सभासदांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेच्या रत्नागिरी शाखेत कार्यरत असलेले शाखाधिकारी जयवंत खुलम यांनी २१ वर्षे यशस्वी सेवा पूर्ण केल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच संस्थेचे पिग्मी व रिकरिंग प्रतिनिधी यांनी केलेल्या कामकाजाबद्दल प्रत्येकी तीन क्रमांकाचा रोख पारितोषिक देवून गौरविण्यात आले.
सभेत संस्थेचा वार्षिक अहवाल, आर्थिक पत्रके व विविध विषयांवर चर्चा करून विषयपत्रिकेतील सर्व विषयांना सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. संस्थेची एकूण सभासद संख्या १०, ४०७ झाली असून भागभांडवल रु. ३, २८, ८४, ४५०/, निधी रु. ५, ९०, १८, ०३९/-, ठेवी रु. ८४, ०८, १७, ७६८/- कर्ज रु. ६०, ४२, ६३, ५१९/- गुंतवणूक रु. ३४, ०२, २८, ६२५/- खेळते भागभांडवल रु.९९, ७७, ४५, ०४१/- एकत्रित व्यवसाय रु.१, ४४, ५०, ८१, २८७/- व नफा रु. १, ०३, ४६, ७२३/- इतका असून ऑडीट वर्ग सतत ‘अ’ आहे. वसुलीचे प्रमाण ९६.३३% आहे. सभासद लाभांश ११% मंजूर करण्यात आला. संस्थेने एन. पी. ए, सी. डी. रेशो, सी. आर. ए. आर. इ. निकषांचे काटेकोर पालन केले आहे. संस्थेचे कार्यक्षेत्र संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात असून लांजा, रत्नागिरी, देवरुख, चिपळूण, राजापूर, दापोली, गुहागर, मंडणगड व खेड येथे शाखा कार्यरत आहेत. सर्व शाखांना सभासदांचा चांगला प्रतिसाद मिळत असून संस्थेच्या सर्व शाखा नफ्यात असल्याबद्दल सभासदांनी समाधान व्यक्त केले.
संस्थेच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्यावतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय ‘दिपस्तंभ’ पुरस्कार सलग सहाव्या वर्षी संस्थेला प्राप्त झाल्याबद्दल सभासदांनी संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. संस्थेकडून सभासदांना देण्यात येणाऱ्या आधुनिक सेवासुविधांबद्दलही सभासदांनी समाधान व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात चंद्रकांत परवडी यांनी सभासदांचे कौतुक करताना संस्थेच्या प्रगतीमध्ये सभासद, संचालक मंडळ, माजी संचालक, स्थानिक कमिटी सदस्य व कर्मचारी यांचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे सांगितले. सभेच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे सर्व संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व शाखाधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले. सभेचे प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप डाफळे यांनी केले व आभार प्रदर्शन उपाध्यक्ष विलास दरडे यांनी केले.




























.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.