loader
Breaking News
Breaking News
Foto

राजेसाहेब श्रीमंत शिवरामराजे भोंसले यांच्या जन्मदिनानिमित्त श्री पंचम खेमराज महाविद्यालयामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन

सावंतवाडी - सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी (स्वायत्त) यामध्ये संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हिज हायनेस श्रीमंत शिवरामराजे भोंसले यांच्या जयंती निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष राजेसाहेब श्रीमंत खेमसावंत भोंसले व मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर रवींद्र कुलकर्णी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी संस्थेच्या चेअरमन शुभदादेवी भोंसले (राणीसाहेब), कार्यकारी विश्वस्त युवराज लखमराजे भोंसले, संस्थेच्या विश्वस्त व सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य जयप्रकाश सावंत, डॉ. सतीश सावंत, संस्थेचे संचालक प्रा.डी टी देसाई, सहाय्यक संचालक अॅड.शामराव सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एल भारमल, महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी तसेच उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी रक्तपेढीच्या डॉ.मनीषा सावंत, प्राजक्ता रेडकर, रवींद्र लोहंबरे, मानसी बागेवाडी, अनिल खाडे, असलम शेख, याचबरोबर ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे अध्यक्ष दयानंद गवस, उपाध्यक्ष मीनल सावंत, सचिव बाबली गावंडे, खजिनदार सिद्धार्थ पराडकर, कार्यकारी सदस्य दीपक पटेकर व दिनेश गावडे आदी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

या रक्तदान शिबिरामध्ये विद्यार्थी व शिक्षक मिळून ४० रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले. या रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. एस एम बुवा, डॉ.डी बी शिंदे प्रा विभा गवंडे एन.सी.सी. नेव्ही अधिकारी डॉ. विशाल अपराध, आर्मी अधिकारी डॉ. एस ए देशमुख, आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे प्रा.आर.बी. शिंत्रे, क्रीडा विभाग प्रमुख प्रा. सी.ए.नाईक यांचे सहकार्य लाभले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg