loader
Breaking News
Breaking News
Foto

लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचा ‘माँ तुझे सलाम’ देशभक्तीचा जल्लोष!

खेड (दिलीप देवळेकर) - १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ‘माँ तुझे सलाम’ देशभक्तीपर गीत गायन व रेकॉर्ड डान्स स्पर्धा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाली. देशभक्तीची भावना, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि कलागुणांचे अप्रतिम सादरीकरण यामुळे संपूर्ण कार्यक्रमाला विशेष रंगत आली. या स्पर्धेचे प्रमुख प्रायोजक सन सिटी, नितीन तलाठी अँड कंपनी, बिल्डिंग अँड डेव्हलपर्स, खेड होते. कार्यक्रमास नितीन तलाठी, तलाठी, नील नितीन तलाठी, नगराध्यक्षा माधवीताई बुटाला, वैभव खेडेकर भाजप नेते, उप नगराध्यक्ष पप्पू शेठ चिकणे, गतनेता बीजेपी रहीम भाई, बांधकाम सभापती सुनील दरेकर, नगरसेवक स्वप्नील सैतावडेकर, संजय मोदी, मिनारजी चिखले, बीजेपी शहर अध्यक्ष नंदू साळवी, शिवसेना शहरप्रमुख कुंदन सातपुते यांची प्रमुख उपस्थिती लाभली.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे अध्यक्ष ला. अविनाश दळवी, सचिव ला. उत्तम कांबळे, खजिनदार ला. संदीप मोरे, कार्यक्रम प्रमुख ला.हनीफ घनसार यांच्यासह ला. रोहन विचारे, शैलेश धरिया, राजा जोयसर, पंकज भाई, मिलिंद भाई, उमेश चव्हाण,ला. शस्मभाई मुकादम, ला. विनोद मोरे, ला. परेश चिखले, ला. सागर चिखले, ला. विवेक कदम, ला. नईम चौगुले, डॉ वेद तलाठी, सागर करवा, संतोष शिंदे, माणिक लोहार, निनाद गांधी, जितेंद्र भिल्लारे,यश बुटाला तसेच लायन्स क्लबचे इतर सदस्य उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्पर्धेचे परीक्षण श्वेता पाटणे, अंजली गिल्डा आणि सांची वानखेडे यांनी केले.स्पर्धेचा निकाल लहान गट प्रथम क्रमांक: श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल, खेड, द्वितीय क्रमांक: ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल, खेड, तृतीय क्रमांक: जिल्हा परिषद शाळा, दस्तुरी, ता. खेड, उत्तेजनार्थ: एल.पी. इंग्लिश स्कूल, खेड, एम.आय.बी. गर्ल्स हायस्कूल, खेड मोठा गट प्रथम क्रमांक: समर्थ कृपा विश्व, वेरळ द्वितीय क्रमांक: नवभारत हायस्कूल, भरणे तृतीय क्रमांक: रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल, भरणे उत्तेजनार्थ: श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल, खेडखुला गट प्रथम क्रमांक: आय.सी.एस. कॉलेज, खेड, द्वितीय क्रमांक: एम.आय. हजबनी स्कूल, खेड तृतीय क्रमांक: एस.एम. इंग्लिश मीडियम स्कूल, दस्तुरी, खेड उत्तेजनार्थ: ज्ञानदीप हायस्कूल, मोरवंडे... सोलो गट प्रथम क्रमांक: रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल, खेड द्वितीय क्रमांक: मुकादम हायस्कूल, खेड तृतीय क्रमांक: एल.टी.टी. इंग्लिश मीडियम स्कूल, खेड उत्तेजनार्थ: नवभारत हायस्कूल, भरणेगीत गायन स्पर्धा प्रथम क्रमांक: प्रफुल मोरे, द्वितीय क्रमांक स्वप्नील वनारे, तृतीय क्रमांक अमोल कांबळे.

टाईम्स स्पेशल

‘माँ तुझे सलाम’ या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळण्याबरोबरच त्यांच्या मनातील देशभक्तीची भावना अधिक दृढ झाली. देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण, आकर्षक रेकॉर्ड डान्स आणि उत्साही वातावरणामुळे कार्यक्रम उपस्थितांच्या कायम स्मरणात राहणारा ठरला. लायन्स क्लब ऑफ खेड सिटीने सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना जोडण्याचा घेतलेला हा उपक्रम कौतुकास्पद ठरला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg