loader
Breaking News
Breaking News
Foto

ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ.खानोलकर यांचे निधन

सावंतवाडी, : ​ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. अरविंद दत्तात्रय खानोलकर (वय ८३) यांचे आज येथे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्यावर उद्या सकाळी ९ वाजता येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. ​गेल्या ६० वर्षांहून अधिक काळ ते वैद्यकीय सेवेत सक्रिय होते.निधनाच्या अगदी तीन दिवस आधीपर्यंत ते रुग्णांची नियमित तपासणी करायचे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ते मुळचे मळगाव येथील रहिवासी.त्यांनी पुण्यातील प्रसिद्ध बी. जे. मेडिकल कॉलेजमधून 'एमबीबीएस' आणि त्यानंतर 'डीसीएच' ही बालरोगतज्ज्ञाची पदवी प्राप्त केली. ज्या काळात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण अत्यंत कमी होते, त्या काळात त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण करून जिल्ह्यात वैद्यकीय सेवेला सुरुवात केली. बांदा येथील सेवाभावी व्यक्तिमत्व असलेले (कै) डॉ द. भि खानोलकर हे त्यांचे वडील. त्यांचाच जनसेवेचा वारसा आयुष्यभर जपत त्यांनी वैद्यकीय सेवा दिली.

टाईम्स स्पेशल

सावंतवाडीसोबतच त्यांनी बांदा व आसपासच्या परिसरात वैद्यकीय सेवा देत अनेक सामाजिक उपक्रम राबविले. शिस्तप्रिय डॉक्टर म्हणून त्यांची ओळख होती. जनसेवा निधी ट्रस्ट सह अनेक सामाजिक संस्थांवर त्यांनी निस्वार्थी वृत्तीने काम केले. येथील संजीवनी बाल रुग्णालयाचे डॉ मिलिंद खानोलकर यांचे ते वडील होत.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुन, नातवंडे असा परिवार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg