loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवने येथील श्रीकृष्ण हळबे यांचे निधन

संगमेश्वर (प्रतिनिधी) : संगमेश्वर तालुक्यातील शिवने येथील जुन्या काळातील दुग्ध व्यावसायिक श्रीकृष्ण जयराम हळबे (९२) यांचे वृद्धापकाळाने मंगळवारी दुपारी ३ वा. राहत्या घरी निधन झाले. श्रीकृष्ण जयराम हळबे यांनी शिवने गावात बाग बागायत, शेती याबरोबरच पशुपालन करुन अनेक वर्षे दुग्ध व्यवसाय केला. ज्यावेळी शिवने येथे जाण्यासाठी पूल नव्हता त्यावेळी पायी येत, पावसाळ्यात होडीतून प्रवास करत त्यांनी संगमेश्वर येथील हॉटेल व्यावसायिकांना दुग्ध पुरवठा केला. किमान ३० वर्षां पेक्षा अधिक काळ त्यांनी दुग्ध व्यवसायातून आपला संसार चालवला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जीवनाच्या अखेर पर्यंत ते करारीपणे जगले. त्यांना कोणताही आजार नव्हता. अखेरचे दोन - तीन दिवस त्यांनी अन्नग्रहण केलं नव्हतं. मात्र सर्वांजवळ ते बोलून चालून होते. सोमवारी रात्री आपल्या मृत झालेल्या सर्व बहिणींची त्यांनी आठवण काढली. मंगळवारी दुपारी १२:३० वा. घरातील सर्वांची चौकशी केली आणि तीन वाजता अंतिम श्वास घेतला. श्रीकृष्ण हळबे यांच्यावर सायंकाळी ७:१५ वा. शिवने येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, ग्रामस्थ, विविध संस्थांचे प्रतिनिधी आदि मान्यवर उपस्थित होते.गावाच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या पश्चात माजी ग्रा. प. सदस्य व सामाजिक कार्यकर्ता असणारा मुलगा रवींद्र उर्फ नाना हळबे, मुली, जावई, नातू, पणतू असा मोठा परिवार आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg