loader
Breaking News
Breaking News
Foto

कोयता गँगचा पुन्हा धुमाकूळ, पहाटेपर्यंतच्या पार्टीत राडा

पुणे, : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या आणि विद्येची राजधानी म्हणून परिचित असलेल्या पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून कोयता गँग धुमाकूळ घालते आहे. धक्कादायक म्हणजे या कोयता गँगमध्ये आता तरुणींचाही सहभाग आढळला आहे. पुण्यातील डेक्कन परिसरातील ’फ्लाईंग जिप्सी’ कॅफेत नुकताच कोयता गँगने राडा केल्याचे उघडकीस आले आहे. सोशल मीडियावरील रील्सच्या लाईक आणि कमेंटवरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर कोयत्याच्या हल्ल्यात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पहाटेपर्यंत सुरू असलेल्या पार्टीदरम्यान ८ ते १० जणांच्या टोळक्याने एका तरुणावर कोयत्याने हल्ला केल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे या टोळक्यात दोन मुलींचाही सहभाग असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कॅफेमध्ये पार्टी सुरू असताना सोशल मीडियावरील रील्सला लाईक आणि कमेंट करण्याच्या मुद्द्यावरून दोन गटांमध्ये वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली. मात्र, काही वेळातच या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर एका गटातील तरुणांनी कोयते काढून एका तरुणावर हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे कॅफेमध्ये मोठी घबराट निर्माण झाली. उपस्थित तरुण-तरुणींनी जीवाच्या भीतीने तेथून धाव घेतली. हल्ला करणार्‍या टोळक्यात दोन मुलींचाही सहभाग असल्याचे सांगण्यात येत असून, या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.

टाईम्स स्पेशल

’फ्लाईंग जिप्सी’ कॅफे यापूर्वीही एका वादामुळे चर्चेत आले होते. २९ जून २०२६ रोजी कॅफेमध्ये तोडफोड आणि गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून पोलीस उपनिरीक्षक संदीप कदम यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करून निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आली होती. आता त्याच कॅफेमध्ये पहाटेपर्यंत सुरू असलेल्या पार्टीदरम्यान कोयत्याने हल्ला झाल्याने पुण्यातील उशिरापर्यंत सुरू असणार्‍या कॅफे आणि पार्टी संस्कृतीवर तसेच सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या घटनेप्रकरणी पोलीस पुढील तपास करत असून हल्ल्यामागील नेमके कारण आणि सहभागी आरोपींची भूमिका तपासली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg