देवरुख ( सुरेश सप्रे ) - संगमेश्वर तालुक्यातील वांझोळे सुवारेवाडीत २१ ऑगस्ट रोजी शुक्रवारी पहाटे ४ वाजण्याच्या दरम्यान भक्षाच्या शोधात बिबट्या घरात घुसला व महिलेवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. यात प्रतिभा दळवी ही महीला गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी देवरुख ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोंबड्याची शिकार करण्याच्या उद्देशाने बिबट्या घरात घुसला त्याने कोंबड्या फस्त केल्याच परंतु महिलेवरही हल्ला केला. सुमारे अर्ध्या तासाहून अधिक काळ प्रतिभा प्रकाश दळवी (वय ६० वर्षे) यांनी बिबट्या बरोबर संघर्ष केला. त्यांनी समयसूचकता, धाडस दाखवत घराचा पुढील दरवाजा उघडल्याने बिबट्याने घरातून पलायन करीत जंगलात धूम ठोकली.
प्रतिभा दळवी यांना उपचारासाठी वांझोळे ग्रामस्थांनी तत्काळ देवरुख ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचाराकरिता रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची खबर मिळताच वन विभागाच्या अधिकार्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान वांझोळे सरपंच व ग्रामस्थांसह वनपाल सागर गोसावी, वनरक्षक सहयोग कराडे, माजी नगरसेवक प्रफुल्ल भुवड. आदी रुग्णालयात दाखल झाले. करंबेळे शेवरवाडी पाठोपाठ वांझोळे सुवारेवाडी येथे बिबट्याने धुमाकूळ घातला असून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होतं आहे.
























1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.