loader
Breaking News
Breaking News
Foto

उभ्या असलेल्या लक्झरी बसच्या हायड्रॉलिक दरवाजात मान अडकल्याने 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

गुजरात - गुजरातच्या वडोदरामध्ये एका हृदयद्रावक घटनेत, एका स्थानिक दुरुस्ती गॅरेजमध्ये उभ्या असलेल्या लक्झरी बसच्या हायड्रॉलिक दरवाजात मान अडकल्याने सात वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला.ही दुर्दैवी घटना सूर्यनगर-तरसाली बायपासजवळ घडली; तिथे दुरुस्तीसाठी बस गॅरेजमध्ये उभी करण्यात आली होती. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये या घटनेचा घटनाक्रम कैद झाला आहे.सुरुवातीच्या फुटेजमध्ये तो मुलगा बसच्या आसपास फिरताना दिसतो. त्यानंतर काही मिनिटांनी, बसच्या स्वयंचलित हायड्रॉलिक दरवाजाच्या यंत्रणेत मान अडकल्यामुळे तो बसला लटकलेल्या अवस्थेत दिसून येतो.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या व्हिडिओमध्ये तो मुलगा दरवाजाला लटकलेल्या अवस्थेत दिसत असला, तरी या घटनेपूर्वीचे महत्त्वाचे फुटेज मात्र उपलब्ध नाही. तो सात वर्षांचा मुलगा वाहनाजवळ गेला किंवा त्याने हायड्रॉलिक दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, तो विशिष्ट क्षण यात रेकॉर्ड झालेला नाही.सुरक्षा यंत्रणेच्या रेकॉर्डिंगमधील या त्रुटीबाबत बोलताना गॅरेजचे मालक निकुंज पटेल यांनी सांगितले की, परिसरातील वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे किंवा तांत्रिक बिघाडामुळे ती महत्त्वाची काही मिनिटे रेकॉर्ड होऊ शकली नसावीत.तरीही, तो मुलगा नेमका कसा अडकला हे दर्शवणारे फुटेज उपलब्ध नसल्यामुळे स्थानिक नागरिक आणि तपासकर्त्यांच्या मनात गंभीर शंका निर्माण झाल्या आहेत; तसेच, यात काही घातपात किंवा संशयास्पद प्रकार घडला असावा का, हा प्रश्नही अनुत्तरित राहिला आहे.

टाइम्स स्पेशल

घडलेल्या घटनाक्रमाची माहिती देताना गॅरेजचे मालक निकुंज पटेल यांनी सांगितले की, ही दुर्घटना घडली तेव्हा ते स्वतः घरी होते आणि त्या वेळी गॅरेजमध्ये कोणताही कामगार उपस्थित नव्हता.मी फोनवर एका कर्मचार्‍याला ओरडत होतो, तेव्हा माझ्या शेजारी बसलेल्या भावाने गॅरेजमधील सीसीटीव्हीचे थेट दृश्य (श्रर्ळींश षशशव) पाहिले, असे पटेल यांनी सांगितले. त्याला तो मुलगा बसच्या दरवाजाला लटकलेल्या अवस्थेत दिसला.ते दृश्य पाहून घाबरलेल्या पटेल यांनी त्वरित आपल्या कामगारांना घटनास्थळी पाठवले आणि स्थानिक प्रशासनाला याची सूचना दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg