केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - कोकण मराठी साहित्य परिषद, रत्नागिरी अंतर्गत कोकण मराठी साहित्य परिषद लांजा शाखेच्या वतीने कराओके मराठी भक्ती गीत गायन स्पर्धा लांजा येथे उत्साहात पार पडली. स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. खुला गट स्पर्धेत श्रुती कुवेस्कर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन व सरस्वती प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी लांजा शाखा अध्यक्ष रामचंद्र जाधव, उपाध्यक्ष डॉ.माया तिरमारे, कार्यवाह प्रकाश हर्चेकर, कोषाध्यक्ष शहाजी देशमुख, जिल्हा प्रतिनिधी बाळू नागरगोजे, शाहीर काशिराम जाधव, सुलभा पोकलेकर, परीक्षक मंगेश वाघाटे,सौ. भिडे मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. माया तिरमारे यांनी केले. एकूण अठ्ठावीस स्पर्धकांनी विविध प्रकारची मराठी भक्ती गीते निवडल्याने रसिक श्रोत्यांसाठी ही सांगितिक पर्वणी ठरली. स्पर्धेत प्रथम क्रमांक श्रुती कुवेस्कर, द्वितीय क्रमांक नागेश बेर्डे, तृतीय क्रमांक सर्जेराव पाटील तर उत्तेजनार्थ एकता प्रभुदेसाई व वैष्णवी किनरे यांची निवड करण्यात आली. तसेच स्पर्धेत लहान मुलांचा सहभाग उत्तम होता. त्यामधून वंश कुरूप यांची विशेष पारितोषिकासाठी निवड करण्यात आली. यावेळी वसंत बाबर आणि नितीन कदम यांनी मनोगते व्यक्त केली. साहित्य, संगीत आणि कला यांचा सुरेख संगम या स्पर्धेत पहायला मिळाला. अशा प्रकारच्या स्पर्धा कोमसाप लांजा शाखेच्या वतीने आयोजित करण्यात याव्यात, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश हर्चेकर, रिया लिंगायत, बाळू नागरगोजे यांनी केले तर आभार सविता पाटील यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने श्रोतावर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संदेश कांबळे, सागर निंबाळकर, राजेश गुरव, राकेश गुरव, मिलिंद कदम, नितीन कदम, ओमकार ठाकूरदेसाई, मंगेश वाघाटे आणि कोकण मराठी साहित्य परिषद शाखा लांजाच्या पदाधिकारी व सदस्यांनी मेहनत घेतली. परीक्षक भिडे यांनी गायलेल्या वंदेमातरम् गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
























1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.