loader
Breaking News
Breaking News
Foto

विजयदुर्ग येथील ऐतिहासीक किल्ल्यावर जागतिक ‘हेलियम डे’ साजरा

देवगड (प्रतिनिधी) - आजच्या तरुण पिढीमध्ये दुरदृष्टी आहे. नवीन गोष्टी आत्मसात करण्यासाठी सर्वतोपरी उमेद, ध्येय, क्षमता आहे. या तरुणांनी विज्ञानाची कास धरून गतिमानता आणल्यास भारत महासत्ता बनायला वेळ लागणार नाही. असे आवाहनात्मक प्रतिपादन आम. प्रमोद जठार यांनी जागतिक ‘हेलियम डे’ निमित्त विजयदुर्ग येथे केले. जागतिक हेलियम डे निमित्त सलग १८वर्षे विजयदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ल्यावर हा दिवस साजरा केला जातो. प्रारंभी सकाळी विजयदुर्ग एसटी डेपो येथून आम प्रमोद जठार यांचे हस्ते श्रीफळ वाढवून प्रभात फेरीला सुरुवात करण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात ही फेरी विजयदुर्ग किल्यामधील साहेबांचे ओटे यापर्यंत काढण्यात आली. या फेरीमध्ये विजयदुर्ग, गिर्ये, जामसंडे येथील नर्सिंग महाविद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थी तसेच स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने सामील झाले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जय जवान जय किसान, जय विज्ञान च्या जयघोषात ही फेरी पार पडली. यावेळी सभापती गणेश राणे, डॉ सुनिल आठवले, प्रसाद देवधर, संजना आळवे, जठार, मानसी आळवे, बबलू सावंत, राजू राऊळ, राजेंद्र जठार, सरपंच रियाज काझी, शुभा कदम, महेश बिडये, किशोर जठार, प्रदीप साखरकर, बाळा कदम, सुनिल सारंग यांचेसह मोठ्या संखेने ग्रामस्थ उपस्थित होते. आम. प्रमोद जठार यावेळी पुढे म्हणाले १८ ऑगस्ट १८६८ ला या ऐतिहासिक किल्ल्यावरून हेलियम वायूचा शोध लागला. त्या काळात कोणतीही आजकाल सारखी यंत्रणा नसताना सुद्धा शास्त्रद्यानी जीवाची बाजी लावत हे ठिकाण शोधले. म्हणून विजयदुर्ग किल्ल्याला एक स्वतंत्र महत्त्व आहे. आजच्या तरुणांमध्ये कोणतेही क्षेत्र मर्यादीत नाही. चीन जपान जर्मनी अमेरिका या देशाचे तरुण पुढे येऊन शिक्षण, क्रीडा, विज्ञान राजकीय व सामाजिक क्षेत्रात पुढे आल्याने ते देश पुढारले असून महासत्ता काबीज करत आहे. आपल्या तरुणांनी सुद्धा विज्ञानाची कास धरून पुढे आल्यास भारत महासत्ता बनायला वेळ लागणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच विजयदुर्ग येथील आग्रे म्युझिसियनला यापूर्वी ५ कोटी मंजूर असून पर्यटन मंत्री यांचेकडून आणखी ५ कोटी साठी पाठपुरावा चालू असल्याचे सांगितले.

टाईम्स स्पेशल

यावेळी विज्ञानप्रेमी डॉ. सुनिल आठवले यांनी ऐतिहासिक हेलियम वायूचा शोध लावण्यासाठी १८ ऑगस्ट १८६८ हा दिवस आपण विज्ञान प्रेमी साजरा करत असलो तरी प्रत्यक्षात त्या काळात गोवा वरून जहाजाने ४०० जणांची टीम याठिकाणी दाखल झाली होती. सुमारे ५२ सेकंदामधील सूर्यग्रहण सर्वात जवळून या ठिकाणावरून पाहताना हा हेलियम वायू अधिक जवळुन पाहता आला, असे त्यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे साहेबाचे ओटे हा एक प्राचीन ठेवा लक्षात घेऊन आग्रे मुझिसियन प्रमाणे माडबन याठिकाणी छोटा पूल झाल्यास रत्नागिरी भागातून पर्यटक थेट येथील यादृष्टीने आम प्रमोद जठार यांनी लक्ष घालावे. या किल्ल्यावर येणार्‍या व स्थानिक ग्रामस्थांनी किल्ला नीटनेटका राहण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन केले. यावेळी प्रसाद देवधर, राजू परुळेकर, सरपंच रियाज काझी, यांनी गेली १८ वर्षे आम प्रमोद जठार यांचे माध्यमातून हेलियम डे साजरा होत, असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg