loader
Breaking News
Breaking News
Foto

स्वरसंगमच्या गायन स्पर्धेत परेश आंब्रे प्रथम! सिद्धी कालगुडे द्वितीय!!

मकरंद सुर्वे(संगमेश्वर)- कडवई येथील स्वरसंगम म्युझिक क्रिएशनच्या वतीने आयोजित ऑनलाइन गायन स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ कडवई ग्रामपंचायत सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. विविध भागांतील गायकांनी सहभाग घेतल्याने स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत परेश आंब्रे (खेड) याने प्रथम क्रमांक पटकावला. सिद्धी कालगुडे (महाड) हिने द्वितीय, रोशनी बुदर (कोकरे) हिने तृतीय, अक्षरा पवार (चिपळूण) हिने चौथा, तर प्रगती भडवळकर (मिरवणे) हिने पाचवा क्रमांक मिळविला. यावेळी मार्गदर्शन करताना शिवसेना विभागप्रमुख तथा कडवई ग्रामपंचायतीचे माजी सरपंच वसंत उजगावकर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. कडवईसारख्या गावात प्रथमच अशा प्रकारची गायन स्पर्धा आयोजित होत असल्याचा आनंद व्यक्त करत, आगामी काळात ही स्पर्धा अधिक भव्य स्वरूपात आयोजित करण्यासाठी प्रयत्न करण्याचे त्यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

भारतीय जनता पक्षाचे रत्नागिरी दक्षिण कार्यकारिणी सदस्य चंद्रकांत यशवंत जाधव यांनीही आयोजकांचे कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे परिसरातील कलाकारांना आपले कलागुण सादर करण्यासाठी चांगले व्यासपीठ मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, सामाजिक तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल प्रशांत प्रकाश कदम यांना यावेळी ‘कोकण क्रांती गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाला ‘मैत्री’ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महेंद्र जाधव, माजी उपसरपंच संतोष जाधव, नंदकुमार फडकले, महेंद्र पाले, शिवराम धामणाक, सुरेश जोशी, रमेश नवेले, मेघनाथ जोशी, बंड्या मयेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

स्पर्धेचे आयोजन मनीष पाले यांनी केले होते. बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी तांबडवाडीतील ग्रामस्थांसह आकाश पाले व ओंकार जोशी यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उदय गावडे यांनी केले. या स्पर्धेमुळे कडवईसह परिसरातील संगीतप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg