loader
Breaking News
Breaking News
Foto

‘मिशन अभय’ची प्रभावी अंमलबजावणी करा : जिल्हाध्यक्ष दिलीप देवळेकर

दापोली : जिल्हा परिषद रत्नागिरीच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन अभय’ उपक्रमाची शाळा पातळीवर प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप देवळेकर यांनी केले. अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, दापोली तालुक्याची सर्वसाधारण सभा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. यावेळी मार्गदर्शन करताना देवळेकर म्हणाले की, ‘मिशन अभय’ हा विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी निगडित अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शिक्षकांनी केवळ समुपदेशकाची भूमिका न बजावता शाळा व्यवस्थापन समिती, पालक व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षिततेबाबत जागृती निर्माण करावी. उपक्रमशील शिक्षक बाबू घाडीगावकर यांचा शिक्षक संघात प्रवेश दापोली तालुक्यातील उपक्रमशील शिक्षक, लेखक व कवी बाबू घाडीगावकर यांनी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघात प्रवेश केला. त्यांच्या साहित्यिक व शैक्षणिक कार्याचा संघटनेला निश्चितच लाभ होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

टाईम्स स्पेशल

सभेत विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले. तसेच शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून त्यांच्या सोडवणुकीसाठी संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी राज्य संयुक्त चिटणीस प्रविण काटकर, जिल्हा सरचिटणीस भालचंद्र घुले यांच्यासह जिल्हा व तालुका पदाधिकारी, शिक्षक उपस्थित होते. विद्यार्थी सुरक्षा, शिक्षकांचे प्रश्न आणि शैक्षणिक गुणवत्तावाढ या विषयांवर संघटनेने सकारात्मक भूमिका घेतल्याने ही सर्वसाधारण सभा मार्गदर्शक ठरली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg