दापोली (वार्ताहर) : दापोली येथील श्री गोपाळ कृष्ण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादितमध्ये सन २०१८-१९ ते २०२२-२३ या कालावधीत २ कोटी ६९ लाख ५० हजार रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सहकार विभागाच्या लेखापरिक्षकानी दापोली पोलीस ठाण्यात ११ संचालक व २ कर्मचारी यांच्यावर एफआयआर दाखल केल्यावर ११ संचालकांनी खेड येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयांत अंतरिम जामिनासाठी वकिलांमार्फत अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणी झाली असून न्यायालयाने तो नामंजूर केला असून अटकपूर्व जामिनावर उद्या (ता.२०) रोजी सुनावणी होणार आहे. काही सभासदांनी आपण आरोग्य विभागाचे कर्मचारी असल्याचे भासवून तशी कागदपत्रे तयार करून दापोली येथील श्री गोपाळ कृष्ण ग्रामीण पतसंस्थेकडून कर्ज घेतले होते. यासंदर्भात पतसंस्थेच्या सभासदांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांचेकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेवून जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था रत्नागिरी यांनी दापोली येथील सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षक श्रीया जीवन झगडे यांची या पतसंस्थेचे लेखापरीक्षण करण्यासाठी लेखापरीक्षक म्हणून १४ ऑगस्ट २०२४ च्या पत्राने नियुक्ती केली होती.
या आदेशानुसार त्यांनी या पतसंस्थेचे सन २०१८-१९ ते २०२२-२३ या कालावधीचे लेखापरीक्षण केले. या लेखापरीक्षणात संस्थेच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, इतर संचालक, व्यवस्थापक व कर्ज अधिकार्यांनी संगनमताने कर्जासाठी स्वीकारलेली कागदपत्रे बनावट असल्याची माहिती असतानाही त्याआधारे कर्ज मंजूर करून संस्थेच्या उपविधीतील नियमांचा भंग केल्याची लेखी तक्रार दापोली पोलीस ठाण्यात केली होती. लेखापरीक्षक झगडे यांना या संस्थेच्या लेखापरीक्षणात काही व्यक्तींना ते सभासद होण्यापूर्वीच कर्ज मंजूर करून कर्जाची उचल देण्यात आली होती व त्यानंतर त्यांना सभासद करण्यात आल्याचे आढळून आल्याचे त्यांनी दापोली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.पगार हमी कर्ज योजना अंतर्गत कर्ज दिलेल्या अनेक सभासदांनी कर्ज मागणी अर्जासोबत जोडलेल्या वेतन दाखल्यावर कार्यालय प्रमुखांची सहीच नसल्याची बाब या लेखापरीक्षणात उघड झाली आहे. अशा तांत्रिक बाबी असताना तत्कालीन संचालक मंडळाने कर्ज कसे मंजूर केले असा सवाल आता विचारला जात आहे.
























1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.