रत्नागिरी : लांजा आणि राजापूर विधानसभा मतदारसंघाचा सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी आणि ग्रामीण भागाचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आमदार किरण सामंत यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. या प्रयत्नांमुळे मतदारसंघात विविध महत्त्वाच्या सिंचन प्रकल्पांना आणि कालवा कामांना राज्य शासनाकडून भरीव निधी मंजूर झाला असून, यामुळे परिसरातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुलभ होण्यास मोठी मदत होणार आहे.
मतदारसंघामध्ये एकूण १७५ कोटी ३३ लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ होणार आहे. यामध्ये धरण आणि कालवा अशा दोन्ही प्रकारच्या बांधकामांचा समावेश असलेले प्रमुख प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने असागे प्रकल्पासाठी २५ कोटी ७१ लाख रुपये, चव्हाणवाडी प्रकल्पासाठी ९१ कोटी ५१ लाख रुपये आणि मुचकंदी प्रकल्पासाठी ५० कोटी ११ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हे तिन्ही प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर स्थानिक शेतकर्यांच्या सिंचनाचा प्रश्न मोठा दिलासा देणारा ठरेल.
याशिवाय, शेतीपर्यंत पाणी सुलभतेने पोहोचवण्यासाठी कालवा पाईप वितरण प्रणालीच्या कामांनाही मंजुरी मिळवून देण्यात आली आहे. या अंतर्गत पन्हाळे येथील कामासाठी ५ कोटी रुपये आणि शिपोशी येथील कामासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या पाईप वितरण प्रणालीमुळे पाण्याचा अपव्यय टाळून पाण्याचा योग्य वापर करणे शक्य होणार आहे. आमदार किरण सामंत यांच्या या दूरगामी निर्णयांमुळे लांजा आणि राजापूर तालुक्यातील सिंचन व्यवस्थेला एक नवी गती मिळणार असून, या विकासकामांचे नागरिकांमधून व शेतकर्यांमधून स्वागत होत आहे.

























1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.