loader
Breaking News
Breaking News
Foto

आमदार शेखर निकम यांच्या पक्षविरहीत, नियोजनबद्ध कार्यपद्धतीवर शिवणे ग्रामस्थांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

देवळे (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालुक्यातील शिवणे येथील ग्रामस्थांनी आमदार शेखर निकम यांच्या नियोजनबद्ध, पारदर्शक व पक्षविरहीत विकास कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजितदादा पवार गट) अधिकृत प्रवेश केला. यावेळी साईप्रसाद लिंगायत, संतोष सनगरे, जयवंत सनगरे, महादेव शिरगावकर, संदेश सनगरे, सचिन सनगरे, राजाराम भोजने, आकाश भेकरे, पराग गुरव, अनिल गेल्ये बाबू गेल्ये, आदी ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आमदार शेखर निकम यांनी आजवर पक्षभेद न करता रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, ग्रामविकास, महिला सक्षमीकरण व युवकांसाठी विविध विकास कामे सातत्याने मार्गी लावली आहेत. “नागरिक हा विकासाचा केंद्रबिंदू” या भूमिकेतून त्यांनी तालुक्यातील अनेक रखडलेली कामे पूर्णत्वास नेली असून, त्याचा थेट फायदा सामान्य जनतेला मिळत आहे. आमदार शेखर निकम म्हणाले, माझ्या राजकारणाचा पाया मतदार संघातील प्रत्येक गावाचा विकास हा आहे. गावाचा प्रश्न माझा प्रश्न आहे, आणि तो सोडवताना कोणत्या पक्षाचा आहे हे मी कधीही पाहिले नाही. काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि प्रामाणिक ग्रामस्थांना सोबत घेऊनच मतदारसंघाचा सर्वांगीण विकास घडवायचा आहे.

टाईम्स स्पेशल

प्रवेशामुळे शिवणे गावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन अधिक मजबूत होणार असून, आगामी काळात विकासाभिमुख राजकारणाला अधिक वेग मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या प्रवेशप्रसंगी तालुका अध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर, उपसभापाती प्रफुल्ल बाईत, पंचायत समिती सदस्या आरुषी घवाळी, युवक अध्यक्ष प्रतिक साळवी, नितिन भोसले, कोसूंब ग्रामपंचायत सदस्य अमित जाधव, आबा जाधव, स्नेहल गुरव, तंटामुक्ती अध्यक्ष हातीव रेहान गडकरी, ओमकार गायकवाड, प्रज्ज्वल जाधव, मारुफ साटविलकर, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg