केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या केंद्रीय संचालक मंडळाचे माजी सदस्य तथा सहकार भारतीचे संस्थापक सदस्य व ज्येष्ठ सहकार तज्ज्ञ सतीश मराठे हे शनिवारी सायंकाळी ५ वाजता लांजा येथे आले असता त्यांचे नागरिकांकडून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
सहकार आणि बँकिंग क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव असलेले सतीश मराठे यांनी आपल्या कार्यकर्तृत्वातून राष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात बँक ऑफ इंडियामधून केली. त्यानंतर ते जनकल्याण सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. तसेच युनायटेड वेस्टर्न बँकेचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. सहकार भारती या राष्ट्रीय संस्थेच्या स्थापनेपासूनच मराठे यांचा सक्रिय सहभाग असून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या केंद्रीय संचालक मंडळावर तसेच नॅशनल हाऊसिंग बँकेच्या संचालक पदावरही त्यांनी काम केले आहे.
लांजा भेटीदरम्यान त्यांच्यासमवेत सहकार भारती कोकण विभागाचे संघटन प्रमुख तथा महाराष्ट्र राज्य काजू बोर्डाचे संचालक धनंजय यादव, सहकार भारती रत्नागिरीचे महामंत्री समीर जानवलकर, लांजातील आरकेपी काजू समूहाचे संस्थापक जयवंत विचारे आदी मान्यवर उपस्थित होते.दरम्यान, यावेळी उद्योजक शिवाजी शेठ कोत्रे, लांजा नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष मिलिंद उर्फ बाबा लांजेकर, मंदार भिंगार्डे, राजेश लांजेकर, लांजा नागरी पतसंस्थेचे संचालक मंडळ, रिक्षा संघटनेचे पदाधिकारी तसेच उपस्थित लांजातील नागरिकांनी सतीश मराठे यांचे पुष्पगुच्छ देऊन उत्साहात स्वागत केले.
































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.