loader
Breaking News
Breaking News
Foto

पोलीस पाटील वसंत शिवगण यांच्या प्रामाणिकपणाबद्द पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्याकडून सत्कार

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) : प्रवासादरम्यान हरविलेले पाकीट मिळाल्यानंतर ते परत करणा-या लांजा तालुक्यातील भांबेड गावचे पोलीस पाटील वसंत सीताराम शिवगण यांच्या प्रामाणिकपणाबद्दल लांजाचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अनिल टोलू पवार (वय ५८, ता. संगमेश्वर) हे १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास साडवली येथे प्रवास करीत असताना त्यांचे पाकीट हरविले होते. या दरम्यान, भांबेडचे पोलीस पाटील वसंत सीताराम शिवगण हे कामानिमित्त संगमेश्वर येथे गेले असता त्यांना सदर पाकीट सापडले. आज 19ऑगस्ट रोजी लांजा पोलीस स्थानकात अनिल पवार यांना सुरक्षित पणे पाकीट ताब्यात देण्यात आले.

टाईम्स स्पेशल

हरवलेले पाकीट परत मिळाल्याने अनिल पवार यांनी समाधान व्यक्त केले. पोलीस पाटील वसंत शिवगण यांनी दाखविलेल्या प्रामाणिक पणाची दखल लांजाचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी घेत शिवगण यांना पुष्पगुच्छ देवून त्यांचा सत्कार केला. पाटील यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg