भरत माने/साखरपा :महावितरणच्या गलथान कारभाराचा फटका साखरपा परिसरातील वीज ग्राहकांना बसत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वेळेवर वीज मीटर रीडिंग न घेतल्याने सलग दोन महिन्यांची बिले सरासरी (Average) पद्धतीने देण्यात आली आणि त्यानंतर प्रत्यक्ष रीडिंग घेतल्यानंतर मागील कालावधीतील वीज वापर एकत्रितपणे बिलात आकारला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.
मीटर रीडिंग वेळेवर न घेणे ही ग्राहकांची चूक नसताना त्याचा आर्थिक भार मात्र ग्राहकांच्या माथी मारला जात असल्याची संतप्त भावना नागरिकांमध्ये आहे. दोन महिन्यांच्या Average Billing नंतर प्रत्यक्ष रीडिंग घेतल्याने मोठ्या प्रमाणात युनिट एकाच बिलात जमा होत आहेत. परिणामी वीज वापराचा उच्च स्लॅब लागू होऊन बिलाची रक्कम वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.विशेष म्हणजे, आधीच्या महिन्यांत Average पद्धतीने आकारण्यात आलेल्या युनिट्सची रक्कम ग्राहकांनी भरली असेल, तर प्रत्यक्ष रीडिंगनंतरच्या बिलामध्ये त्या रकमेचे योग्य Adjustment/Credit झाले आहे का, याबाबतही स्पष्टता नसल्याने ग्राहकांमध्ये संभ्रम आहे.
याबाबत ग्राहकांची एकच मागणी आहे की,हिशोब पारदर्शक द्या!’महावितरणने साखरपा परिसरातील अशा सर्व बिलांची तातडीने फेरतपासणी करावी. Average Billing झालेल्या महिन्यांची युनिट्स, प्रत्यक्ष मीटर रीडिंग, आधी भरलेली रक्कम आणि त्यानंतर केलेले Adjustment यांचा संपूर्ण हिशोब ग्राहकांना उपलब्ध करून द्यावा.तसेच प्रत्यक्ष वीज वापराचा कालावधी लक्षात घेऊन युनिट्सचे महिनानिहाय विभाजन करून संबंधित कालावधीतील लागू दर व स्लॅबनुसार बिलांची पुनर्गणना करावी. मीटर रीडिंग घेण्यास झालेल्या विलंबामुळे ग्राहकांवर जादा स्लॅबचा आर्थिक भार पडला असल्यास तो तातडीने कमी करून सुधारित बिले देण्यात यावीत, अशी मागणी होत आहे.तसेच नियमित रीडिंगची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली आहे.मीटर रीडिंग घेण्याची जबाबदारी असतानाही प्रत्यक्ष रीडिंग वेळेवर न घेतल्याने ग्राहकांना Average Bill देणे आणि नंतर मोठ्या रकमेचे बिल पाठविणे हा प्रकार थांबविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
























1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.