loader
Breaking News
Breaking News
Foto

विनायक मुंडे यांची भाजपा उत्तर रायगड भटके विमुक्त आघाडीच्या जिल्हा सहसंयोजकपदी निवड

पनवेल : भाजपा उत्तर रायगड भटके विमुक्त आघाडीच्या जिल्हा सहसंयोजकपदी विनायक मुंडे यांची निवड करण्यात आली. यावेळी भटके विमुक्त आघाडीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष बबन बारगजे यांच्या उपस्थितीत विनायक मुंडे यांना नियुक्तीपत्र देऊन पुढील सामाजिक व संघटनात्मक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या निवड कार्यक्रमास भाजपा महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा आमदार प्रशांतदादा ठाकूर, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस तथा पनवेलचे महापौर नितीनभाई पाटील, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, सभागृह नेते व सरचिटणीस प्रकाश बिणेदार, सरचिटणीस दीपक बेहेरे, प्रीतमजी म्हात्रे तसेच सर्व मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

भाजपाच्या संघटनात्मक विस्तारासोबतच भटके-विमुक्त समाजाच्या विविध प्रश्नांना प्रभावीपणे मांडण्यासाठी आणि समाजाच्या विकासासाठी काम करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. उत्तर रायगडमध्ये भटके-विमुक्त आघाडीचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी विनायक मुंडे यांच्या निवडीचा निश्चितच फायदा होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी विनायक मुंडे यांच्यासोबत अंकुश खरमाटे, आजिनाथ जायभाये, राजेंद्र वनवे, विठ्ठल घोळवे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. विनायक मुंडे हे श्री संत वामन भाऊ व भगवान बाबा सेवा मंडळ खंडा कॉलनी या मंडळाचे उपाध्यक्ष ही आहेत व गेली अनेक वर्ष खांदा कॉलनीमधील अनेक सामाजिक व राजकीय कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असतो. त्यांच्या या कामाकडे पाहून त्यांची भटके विमुक्त आघाडीच्या उत्तर रायगड जिल्हा सहसंयोजक पदी निवड करण्यात आली आहे.

टाईम्स स्पेशल

या नियुक्तीबद्दल विनायक मुंडे यांचे भटके विमुक्त आघाडीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष बबन बारगजे यांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. व पक्ष वाढीसाठी जोमाने काम करण्याच्या सूचना दिल्या व मार्गदर्शन केले. विनायक मुंडे यांची निवड झाल्याबद्दल श्री संत वामन भाऊ व भगवान बाबा सेवा मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी त्यांचे मंदिरामध्ये स्वागत केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg