loader
Breaking News
Breaking News
Foto

राज ठाकरेंच्या आदेशानंतर जितेंद्र चव्हाण मनसेमध्ये पुन्हा सक्रिय, जिल्हाध्यक्षपदी निवड

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील मनसेचे नेते जितेंद्र चव्हाण यांनी गेले काही दिवस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये सक्रिय नव्हते. परंतु राज ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची पुन्हा एकदा जिल्हाध्यपदी वर्णी लागली आहे. त्याच्या निवडीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. कडवई येथील जितेंद्र चव्हाण हे मनसेच्या स्थापनेपासून राजसाहेबांचे विश्वासू शिलेदार म्हणून कार्यरत आहेत. आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी यादववाडी ब्रिज, कडवई रेल्वेस्टेशन अशी मोठी कामे पूर्णत्वास नेली होती. एक लढवय्या कार्यकर्ता म्हणून ते परिचित आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दोन वर्षांपूर्वी पक्षातील अंतर्गत कुरघोड्याना कंटाळून त्यानी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर पक्षात मरगळ आली. त्यांचे जवळचे काही साथीदार पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेले मात्र ते पक्षाशी एकनिष्ठ राहिले.पक्षाचे काम थांबवले तरी त्यांचे समाजकार्य अविरत सुरू होते. नुकतीच राज ठाकरे यांनी त्यांना मुंबई ला बोलावून पुन्हा एकदा त्याच्यावर मध्य रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. त्यांच्या या निवडीने कार्यकर्यांमध्ये पुन्हा एकदा उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.

टाईम्स स्पेशल

या निवडीनंतर त्यांच्याशी सम्पर्क साधला असता पक्षातील काही नेत्यांनी स्वहितासाठी चालवलेल्या घाणेरड्या राजकारणाला कंटाळून आपण आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. मात्र आपण कायम पक्षाशी एकनिष्ठ होतो. राजीनामा दिल्यानंतर मला अनेक पक्षाकडून ऑफर आल्या मात्र आपण त्या स्वीकारल्या नाहीत. राजसाहेबांनी माझ्यावर मध्य रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. ती समर्थपणे स्वीकारून भविष्यात जिल्ह्यात पक्षाशी ताकद वाढवून राजसाहेबांना बळ देण्यासाठी कटिबद्ध राहू असे त्यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg