loader
Breaking News
Breaking News
Foto

तामिळनाडू भाजपा प्रदेशाध्यक्ष विरोधात FIR दाखल, मुख्यमंत्री विजय आणि त्यांच्या "आई " बाबत अपमानास्पद विधान केल्याच्या आरोप

नवी दिल्ली : तामिळनाडूचे भाजपा प्रदेशाध्यक्ष नैनार नागेंद्रन यांच्याविरुद्ध महिला वकिलांनी मुख्यमंत्री विजय यांच्या आईबाबत सार्वजनिक ठिकाणी अपमानास्पद शब्द उच्चारले ,याबाबत राज्य पोलीस महानिर्देशक यांच्याकडे अर्ज दाखल केला होता , पोलिसांनी नागेंद्रन यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केला . सार्वजनिक कार्यक्रमात मुख्यमंत्री जोसेफ विजय आणि त्यांची आई यांच्याबाबत अपमानास्पद विधान केले होते,असे तक्रारी अर्जात म्हटले होते . तक्रारदार वकील यांनी पोलिसांकडे डिजिटल पुरावे सुरक्षित ठेवणे, संबंधित कायद्याच्या प्रावधनाबाबत चौकशी करणे आणि मानहानी व सार्वजनिक विधानाबाबत कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती. शनिवारी चेन्नईमध्ये भारतीय जनता पार्टीचे राज्य मुख्यालय कमलालयम येथे नयनर नागेंद्रन यांनी अपमानास्पद विधान केले होते , त्यामुळे राज्यात राजकीय वाद निर्माण झाला .

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पक्षाच्या कार्यक्रमात बोलताना नागेंद्रन यांनी विजय यांच्या वडिलांचे नाव उच्चारून चेष्टा केली , जी माणसे विचारत आहेत की त्यांचे वडील कोठे आहेत त्यांना विधानसभेत उत्तर देण्यापेक्षा त्यांनी आपल्या आईला घरी विचारले पाहिजे.द हिंदू या दैनिकाच्या वृत्तानुसार अर्जदार महिला वकील वर्धिनी यांनी सीएम विजय आणि त्यांची आई यांच्याबाबत बीजेपी नेत्यांने केलेल्या विधानाबाबत अपमानास्पद टिकेबाबत आणि त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाईची मागणी केली होती अर्जामध्ये पोलिसांना असे सांगण्यात आले होते की त्यांनी याप्रकरणी चौकशी करून ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग पहावी आणि ते जप्त करावे. हा वाद एप्रिल 2020 च्या विधानसभा निवडणुकीत डीएमकेचा पर्याय झाल्यानंतर तामिळनाडू विधानसभेमध्ये सीएम विजय यांच्या पाठीमागील विधानंबा बस सुरू झाला मुख्यमंत्री विजय यांनी विधानसभेत एक लहान गोष्ट ऐकवली होती ज्यामध्ये त्यांनी स्टालीनचे वडील एम के स्टाईल इन यांच्या निवडणूक पराजय बाबत विधान केले होते. भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या बाबतीत त्यांच्या विधानाबद्दल भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये देखील नाराजी आहे. त्यांनी आई वरून बोलायला नको होते असे भाजपाच्या कार्यकर्त्यांमधूनच म्हटले जात आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg