loader
Breaking News
Breaking News
Foto

लोकरवण ग्रुप ग्राम पंचायतीच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी संजीव राजविलकर यांची सलग दुसऱ्यांदा निवड

मंडणगड (प्रतिनिधी) : मंडणगड तालुक्यातील म्हाप्रल पंचक्रोशीतील महत्वाची ग्रामपंचायत असलेल्या लोकरवण ग्रुप ग्रामपंचायतीच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा संजीव राजविलकर यांची ग्राम सभेत एकमताने निवड झाली. तंटामुक्ती अध्यक्ष श्री. राजविलकर यांच्या यशस्वी निवडीचे स्वागत करण्यात येत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

लोकरवण ग्राम पंचायतीच्या ग्रामसभा सरपंच श्वेता शिगवण, उपसरपंच अशोक गोठल यांच्या उपस्थितीत पार पडली. या सभेत तंटामुक्ती अध्यक्ष निवडीचा विषय पटलावर होता. तंटामुक्ती अध्यक्षपदी संजीव राजवीलकर तर उपाध्यक्ष म्हणून मंगेश गायकवाड यांची ग्राम सभेने एकमताने निवड केली. या ग्रामसभेला शासकीय अधिकारी म्हणून ग्रामपंचायत अधिकारी प्रीतम शिंगाडे या उपस्थित होत्या. त्यांच्यासह उपस्थित सर्वांनीच अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचे अभिनंदन केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg