सावंतवाडी - माजगाव मोर डोंगरी बीएसएनएल टेलिफोन कॉलनी मध्ये बंद असलेली तीन घरे अज्ञात चोरट्यांनी फोडून धाडसी चोरी केली. सोमवारी पहाटे ही चोरीची घटना घडली. यातील सिद्धी रेडकर यांच्या एका घरातून कपाट फोडून चोरट्यांनी २५ लाख रुपये किंमतीचे ३१ तोळे सोन्याचे दागिने, ३५ ग्रॅम वजनाच्या चांदीच्या वस्तू व तीन हजार रुपये रोख रक्कम असा ऐवज चोरून नेला आहे. नागपंचमी सणानिमित्त रेडकर कुटुंबीय आपल्या मूळ कुडाळ या गावी गेले असता चोरट्यांनी ही धाडसी चोरी केली. या चोरी नंतर चोरट्यांनी बापू तुळसकर यांची व आणखीन एक दुचाकी मिळून दोन दुचाकी घेऊन पलायन केले. घटनास्थळी सावंतवाडी पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला. याप्रकंरणी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर घरफोडी व दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
माजगाव मोरडोंगरी येथील बीएसएनएल टेलिफोन कॉलनी मधील तीन घराना अज्ञात चोरट्यांनी सोमवारी पहाटे लक्ष केले. चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांनी कॉलनीतील तीन बंद घरे फोडून चोरी केली. यातील फिर्यादी सिद्धी रेडकर या आपले पती व मुलांसह नागपंचमीच्या निमित्ताने घर बंद करून कुडाळ येथे गेले होते. पहाटे चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप व कोयंडा कटावणीने तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील कपाट फोडून लॉकर मध्ये ठेवलेले २५ लाख रुपयांचे ३१ तोळे सोन्याचे दागिने, ३५ ग्रॅम चांदीच्या वस्तू व तीन हजार रुपये रोख रक्कम असा ऐवज लंपास केला. तर त्याचे शेजारी असलेले रामचंद्र सावंत, मारुती सावंत यांच्या बंगल्यात प्रवेश करून चोरीचा प्रयत्न केला. परंतू या दोन घरातून चोरट्यांच्या हाती फारसे काही लागले नाही. यातील सावंत कुटुंबीय हे मुंबई येथेच असतात. त्यामुळे त्यांची घरे बंदच असतात. सोमवारी सकाळी रेडकर यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसल्यावर या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. चोरट्यांनी जाताना फिर्यादी यांचे वडील बापू तुळसकर यांची सुपर स्प्लेंडर दुचाकी घेऊन पलायन केले.
विशेष म्हणजे, याच परिसरातील रामचंद्र सावंत आणि मारुती सिताराम सावंत यांच्या घरातही अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, त्यांच्या घरातून किती सामान चोरीस गेले याची माहिती समजू शकली नाही. ते मुंबई येथे राहत असल्याने त्यांना बोलविण्यात आले आहे. त्यांनतर माहिती मिळणार आहे. घटनास्थळी संध्याकाळी अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी भेट देत पाहणी केली. पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, सहा. पो. निरीक्षक हर्षद हिंगे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश पाटील यांनी भेट घेत चोरट्यांचा शोध घेतला. या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी श्वान पथक व फॉरेन्सिक लॅब पथकाला पाचारण करण्यात आले असून, संशयित चोरट्यांचे ठसे घेण्यात आले आहेत. या परिसरात तसेच रस्त्यावरील सिसिस्टीव्ही कॅमेरे बंद असल्याने तपासात अडथळा निर्माण होत आहे. तर काही ठिकाणी फुटेज सापडले असून चोरट्यांचा शोध सुरू आहे. या चोरीच्या गुन्ह्यांतील चोरटे बाहेरील राज्यातील असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश पाटील करत आहेत.

























1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.