loader
Breaking News
Breaking News
Foto

वायरी येथे नारळ लढविणे स्पर्धा

मालवण (प्रतिनिधी) - पारंपरिक खेळाला आधुनिक स्पर्धेची रंगत देत केदार झाड मित्र मंडळाच्या वतीने भव्य 'नारळ लढवणे स्पर्धा २०२६' आयोजित करण्यात आली आहे. बुधवार, १९ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता भूतनाथ मंदिराजवळ ही स्पर्धा रंगणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला ११,१११ रुपये, तर द्वितीय क्रमांकाच्या विजेत्याला ७,७७७ रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. सेमी फायनलमध्ये पराभूत होणाऱ्या दोन स्पर्धकांनाही प्रत्येकी २,००० रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.

टाईम्स स्पेशल

नारळ लढवण्याच्या पारंपरिक खेळाला प्रोत्साहन देण्याबरोबरच स्थानिक युवकांना एकत्र आणणे आणि मनोरंजनातून पारंपरिक संस्कृतीची जपणूक करणे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी होऊन या पारंपरिक खेळाचा आनंद घ्यावा, असे आवाहन केदार झाड मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg