loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी पंचायत समिती बैठकीत निकृष्ट पोषण आहारावरून जोरदार गदारोळ; उच्चस्तरीय चौकशीचे निर्देश

सावंतवाडी (प्रतिनिधी) - शालेय पोषण आहाराचा दर्जा निकृष्ट असतानाही प्रयोगशाळेच्या अहवालात तो चांगला असल्याचे दाखवण्यात आल्याने सावंतवाडी पंचायत समितीच्या मासिक बैठकीत सदस्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. या प्रकरणी उपसभापती गौरव मुळीक, जितेंद्र गावकर यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाची झाडाझडती घेतली, तर अंगणवाड्यांमध्ये पुरवठा होणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या पांढऱ्या वटाण्याबाबत सदस्य प्रथमेश सावंत यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. ​पंचायत समितीची मासिक सभा सभापती सुष्मिता जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपसभापती गौरव मुळीक आणि गटविकास अधिकारी निलेश जाधव उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​सभेच्या सुरुवातीलाच सदस्य जितेंद्र गावकर यांनी शालेय पोषण आहाराच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केले. "विद्यार्थ्यांना दिलेला पोषण आहार खराब होता, तरीही प्रयोगशाळेने चुकीचा निष्कर्ष कसा काढला? हा निष्कर्ष आम्हाला मान्य नाही," असा सवाल सदस्य जितेंद्र गावकर यांनी केला. तसेच या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी उपसभापती गौरव मुळीक यांनी केली. सर्व केंद्रप्रमुखांकडून लिखित पत्रे घेऊन योग्य ती चौकशी व्हावी आणि आपल्या समक्ष पंचनामा केला जावा, असे गावकर यांनी स्पष्ट केले. ​विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप करत प्राजक्ता केळुसकर आणि धनश्री मराठे यांनीही या मुद्द्याकडे लक्ष वेधले. तर सदस्य मायकल डिसोझा यांनी पुरवठादाराच्या कारभारावर आक्षेप घेतला. संबंधित कंत्राटदार गेली आठ वर्षे धान्य पुरवठा करत असून, त्याची चौकशी करण्यासाठी एक विशेष समिती स्थापन केली जाईल, असे गटविकास अधिकारी निलेश जाधव यांनी सांगितले.

टाईम्स स्पेशल

दुसरीकडे, अंगणवाड्यांमध्ये पुरवठा केला जाणारा पांढरा वटाणा अत्यंत निकृष्ट दर्जाचा असल्याने त्यावर प्रशासनाने त्वरित दखल घ्यावी, अशी मागणी प्रथमेश सावंत यांनी केली. "निकृष्ट दर्जाचे धान्य वाटप करून विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळण्यापेक्षा त्यांना थेट पैसे द्यावेत, असा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा," अशी आक्रमक भूमिका जितेंद्र गावकर यांनी मांडली. या चर्चेत प्रणाली टिळवे, प्रशांत सुकी, उदय पारिपत्ये आणि महेश धुरी यांनीही सहभाग घेतला. ​सभापती सुष्मिता जाधव म्हणाल्या, ​शालेय पोषण आहाराचे नमुने तपासणीसाठी आता दोन वेगवेगळ्या प्रयोगशाळांमध्ये पाठवले जातील.​प्राथमिक शाळांनी धान्य पुरवठ्याची प्रत्यक्ष पडताळणी करावी आणि केंद्रप्रमुखांनी यावर बारकाईने लक्ष ठेवावे.​पोषण आहार पुरवठ्याचा दरमहा आढावा घेतला जाईल.​शालेय तसेच अंगणवाडीतील आहाराच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड न करता योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश सभापती सुष्मिता जाधव यांनी दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg