loader
Breaking News
Breaking News
Foto

शाळा नाणीज नंबर १ येथे विद्यार्थी ओळखपत्र वितरण, संस्कृती सरफरे यांचे सलग दुसऱ्या वर्षी सहकार्य

रत्नागिरी - रत्नागिरी तालुक्यातील खानू केंद्रांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाणीज नंबर १ येथे शाळेतील एकोणतीस मुलांना ओळखपत्र देणगीदार संस्कृती अमोल सरफरे पोलीस पाटील नाणीज सरफरेवाडी सलग दुसऱ्या वर्षी वितरण केली. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला विद्यार्थी ओळखपत्र वितरण कार्यक्रमाला देणगीदार नाणीज सरफरेवाडी पोलीस पाटील संस्कृती अमोल सरफरे, नाणीज गावचे पोलीस पाटील नितीन कांबळे, नाणीज ग्रामपंचायत ग्राम विकास अधिकारी पी.पी. मुद्राळे, माजी विद्यार्थी प्रशांत संसारे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीराम दाणी, उपाध्यक्षा सोनाली संजय कोकरे यांसह पालक बहुसंख्येने उपस्थित होते. संस्कृती अमोल सरफरे यांनी उदार हस्ते देणगी देऊन शाळेला मोलाचे सहकार्य केले आहे त्याबद्दल शालेय व्यवस्थापन समिती व सर्व पालक यांनी त्यांना धन्यवाद दिले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg