loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीत रस्ता जनावरांचा की वाहनांचा? मोकाट गुरांमुळे नागरिक, वाहनचालक बेजार

रत्नागिरी, (वार्ताहर): रत्नागिरी शहरामध्ये रस्त्यावर मोकाट गुरांचे कळप ठिकठिकाणी बसत असल्याने वाहतुकीची मोठी कोंडी होत असून नागरिकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. कारवांची वाडी ते आरोग्यमंदिर यादरम्यान रस्त्यावर जनावरांचे कळप बसलेले आढळून येत असल्याने वाहनचालक आणि विशेषतः दुचाकीस्वारांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जनावरे येण्या-जाण्याच्या रस्त्यावर बसून राहत असल्यामुळे अचानक उद्भवणार्‍या परिस्थितीमुळे वाहनचालकांना गाड्या नियंत्रित करणे कठीण होऊन जाते.रात्रीच्या वेळी तर अंधारात ही जनावरे दिसत नसल्याने गंभीर अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. रस्त्यावर मोकाट फिरणार्‍या या जनावरांना नेमके वाली-वारस कोण नाही का असा संतप्त सवाल त्रस्त वाहनचालकांकडून उपस्थित केला जात आहे.

टाईम्स स्पेशल

विशेषतः दुचाकी चालकांसाठी हा प्रश्न अत्यंत धोकादायक बनला आहे. बसलेल्या किंवा रस्त्यावर उभ्या असलेल्या जनावरांमध्ये अचानक वाद किंवा आपसात भांडण झाल्यास ती बिथरण्याची शक्यता असते. अशा वेळी ती समोरून जाणार्‍या वाहनांच्या अंगावर धावून जाऊन मोठी दुखापत घडवू शकतात.या गंभीर समस्येमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, संबंधित प्रशासनाने तातडीने या प्रकारची दखल घ्यावी. रस्त्यावर विनाकारण भटकणार्‍या आणि अडथळा ठरणार्‍या या जनावरांचा बंदोबस्त करून त्यांना तात्काळ त्यांच्या संबंधित मालकांच्या स्वाधीन करावे अशी जोरदार मागणी संतप्त नागरिक व वाहनचालकांकडून केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg