loader
Breaking News
Breaking News
Foto

भुईबावडा घाटात भलीमोठी दरड कोसळली

वैभववाडी (प्रतिनिधी) - तालुक्यात गेले दोन दिवस जोरदार कोसळणाऱ्या पावसाने रविवारी पहाटे भुईबावडा घाटात भलीमोठी दरड कोसळली. त्यामुळे गगनबावडा खारेपाटण राज्यमार्गवरील वाहतूक ठप्प झाली होती. जेसीबीच्या साह्याने दरड बाजूला करून सकाळी 10 वा नंतर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. दुपार नंतर संपूर्ण दरड बाजूला काढून मार्ग मोकळा करुन वाहतूक सुरळीत करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तालुक्यात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. या जोरदार कोसळणाऱ्या पावसाने रविवारी पहाटे 6 वाढ सुमारास रिगेवाडीपासून सुमारे 6 किमी अंतरावर भलीमोठी दरड कोसळली. यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. या मार्गावरी वाहतूक करुळ घाटमार्ग वळवण्यात आली होती. याची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अमोल पाटील, राजू कोळेकर यांच्यासह नागरिकांनी घटनास्थळी दाखल झाले.

टाईम्स स्पेशल

तत्काळ सा. बा. विभागाच्या वतीने जेसीबी लावून सकाळी 10 वा पुर्वी एकेरी वाहतूक सुरू केली. दरड हटवण्याचे काम युद्ध पातळीवर करुन दुपारी 1वा सुमारास संपूर्ण दरड हटवून मार्ग मोकळा केला वाहतूक सुरळीत करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg